• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

युनूस तांबटकर यांना वरिष्ठ सत्र न्यायालयाचा दणका

ByMirror

Nov 20, 2025
परावलंबी व दुर्धर व्याधींनी पीडितांसाठी पुढाकार

मनाई हुकूमाचा दावा फेटाळला

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टची मिळकत सर्व्हे नंबर 968 एम.जी. रोड येथील मिळकतीमध्ये अनेक वर्षापासून भाडेकरू आहेत. सदर मिळकतीमध्ये एका मोबाईल शॉपच्या दुकानाच्या छताचा काही भाग पडला होता. सदर भाडेकरु यांनी ट्रस्टच्या अधिकृत कार्यालयात येऊन चर्चा करून ट्रस्टचे जनरल सेक्रेटरी रेहान काझी यांना अर्ज दिला होता. त्याप्रमाणे सदर भाडेकरूने छत दुरुस्तीचे काम सुरू केले असता, युनूस तांबटकर व इतर यांनी सदरच्या कामात अडथळा निर्माण करून गोंधळ घालून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण केल्याने कोतवाली पोलीस स्टेशनच्या पोलिसांना पाचरण करण्यात आले होते.


युनूस तांबटकर यांनी जिल्हा सत्र न्यायालयात सदर दुकानाच्या दुरुस्तीच्या कामात मनाई हुकूम मिळवण्यासाठी स्वतः नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्टचा अध्यक्ष भासवून दावा दाखल केला होता. न्यायालयाने सर्व प्रकरणाची व कागदपत्रांची पाहणी करून दोन्ही बाजूंच्या वकिलांचे युक्तिवाद ऐकून, सदर प्रकरणी वादी युनूस तांबटकर आणि शेख इम्रान शफी अहमद हे ट्रस्टचे विश्‍वस्त नाहीत. त्यांना सदर मिळकतीबाबत दावा दाखल करण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यामुळे सदर मिळकतीबाबत दाखल केलेला मनाई हुकूमचा दावा बेकायदेशीर विश्‍वस्तांनी ट्रस्टमार्फत दाखल केल्याचे समोर आले. तसेच युनूस तांबटकर व इतर यांनी ट्रस्ट मार्फत दाखल केलेल्या मनाई हुकूम मिळणाचा दावा न्यायालयाने रद्द केला आहे. प्रतिवादी यांच्या वतीने ॲड. वसीम सय्यद आणि नवाज शेख यांनी कामकाज पाहिले.


युनूस तांबटकर स्टचे अधिकृत विश्‍वस्त नसल्याने त्यांना भाडेकरू यांना भाडे वसुलीबाबत नोटिसा देण्याचा अधिकार नाही. ट्रस्टच्या भाडेकरू यांनी चूकीच्या पध्दतीने दिले गेलेल्या नोटीसाला न घाबरता. आपले भाडे ट्रस्टचे अधिकृत कार्यालयात चेकद्वारे जमा करावे. -रेहान काझी (जनरल सेक्रेटरी, नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट)

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *