• Tue. Oct 13th, 2026

Mirrornews24

Marathi News

फिर्यादीच आरोपी असलेल्या गुन्ह्यात चिरंजीव गाढवे यांचा जामीन न्यायालयाने फेटाळला

ByMirror

Oct 13, 2026
परावलंबी व दुर्धर व्याधींनी पीडितांसाठी पुढाकार

स्वतःवरील हल्ल्याचा बनाव केल्याचे पोलीस तपासात समोर आल्याने फिर्यादीच बनला आरोपी
गाढवेच्या अडचणीत वाढ


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या कथित प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणाला तपासादरम्यान नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणात सुरुवातीला फिर्यादी असलेल्या चिरंजीव गाढवे यांनाच पोलिसांनी आरोपी म्हणून गुन्ह्यात समाविष्ट केले आहे. इतर व्यक्तींना गुन्ह्यात अडकविण्यासाठी स्वतःवरील हल्ल्याचा कट रचल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. या प्रकरणात चिरंजीव गाढवे यांनी दाखल केलेला जामीन अर्ज जिल्हा न्यायालयाने 12 ऑक्टोबर रोजी फेटाळला आहे. जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यामुळे फरार असलेल्या चिरंजीव गाढवे यांच्या अडचणी वाढल्या आहे.


या प्रकरणातील फिर्यादी चिरंजीव गाढवे यांनी आपल्यावर झालेला कथित हल्ला हा पप्पू शेठ आणि गौरव भाऊ यांच्या सांगण्यावरून करण्यात आल्याची फिर्याद तोफखाना पोलीस ठाण्यात दिली होती. या आरोपांच्या अनुषंगाने पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीच्या आधारे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. पोलिसांच्या तपासानुसार, गाढवे यांनीच कथितरीत्या सुपारी देऊन स्वतःवर प्राणघातक हल्ला करवून घेतला आणि इतर व्यक्तींना गुन्ह्यात अडकविण्याचा प्रयत्न केला. या निष्कर्षानंतर पोलिसांनी गुन्ह्यात संबंधित कलमे वाढवून चिरंजीव गाढवे यांनाच आरोपी म्हणून समाविष्ट केले.


आरोपी म्हणून नाव समाविष्ट झाल्यानंतर चिरंजीव गाढवे यांनी जिल्हा न्यायालयात जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. या अर्जाच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. गोरख मुसळे यांनी युक्तिवाद केला. आरोपीच्या कथित गुन्हेगारी पार्श्‍वभूमीचा तसेच प्रकरणाच्या तपासासाठी त्याच्या कोठडीची आवश्‍यकता असल्याचा मुद्दा सरकारी पक्षाने न्यायालयासमोर मांडला.


सरकारी पक्षाचा युक्तिवाद आणि मांडण्यात आलेले मुद्दे विचारात घेऊन जिल्हा न्यायालयाने 12 ऑक्टोबर रोजी गाढवे यांचा जामीन अर्ज फेटाळला. तसेच या प्रकरणाच्या पुढील तपासासाठी आरोपीच्या कोठडीची गरज असल्याचे न्यायालयाने नमूद केले. या सुनावणीमध्ये सरकार पक्षातर्फे ॲड. गोरख मुसळे यांनी काम पाहिले. त्यांना ॲड. सागर व्हावळ यांनी सहाय्य केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *