• Fri. Nov 15th, 2024

मनीषा गायकवाड यांचा महाराष्ट्र हिरकणी स्टार राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

  • Home
  • मनीषा गायकवाड यांचा महाराष्ट्र हिरकणी स्टार राष्ट्रीय पुरस्काराने गौरव

कराड-सातारा येथे झालेल्या राष्ट्रीय एकता सामाजिक लोक गौरव परिषदेत झाला सन्मान

नगर (प्रतिनिधी)- राष्ट्र उभारणीसाठी शैक्षणिक, सामाजिक, कला व सांस्कृतिक क्षेत्रात देत असलेल्या उत्कृष्ट योगदानाबद्दल भिंगार हायस्कूलच्या पर्यवेक्षिका मनीषा प्रफुल्ल गायकवाड यांना कराड-सातारा येथे झालेल्या राष्ट्रीय एकता सामाजिक लोक गौरव परिषदेत महाराष्ट्र हिरकणी स्टार राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.


कला पर्यटन व सांस्कृतिक महोत्सव समिती (महाराष्ट्र) व मोकळा श्‍वास सामाजिक विकास संस्थेच्या (सातारा) वतीने राष्ट्रीय एकता सामाजिक लोक गौरव परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते गायकवाड यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.


गायकवाड या शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात मागील 28 वर्षापासून योगदान देत आहेत. समाजातील गरजू विद्यार्थी व महिलांना ते नेहमीच आधार देण्याचा काम करत असतात. अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी घडवले असून, ते आज उच्च पदावर कार्यरत आहेत. शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना महाराष्ट्र हिरकणी स्टार राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.