तर 3 लाख 30 हजार रुपयांचा दंड
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील कल्पतरू मल्टीपर्पज को.ऑप.सो. या पतसंस्थेला परताव्या पोटी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी नगर येथील अति. मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी आरोपी अजय सुरेश औसरकर यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 278(2) नुसार नि.इ.कलम 138 मध्ये दोषी धरण्यात आले व 2 महिने साधा कारावास व 3,30,050/-रुपये दंड ठोठावला आहे. दंड न दिल्यास 2 महिन्याचा अधिकचा साधा कारावास अशी शिक्षा सुनावली.
आरोपीने पतसंस्थेकडून 1,00,000/- रुपये चे कर्ज घेतले होते. त्या कर्जाच्या रकमेचा परता वा म्हणून आरोपीने त्याचे खाते असलेल्या आय.सी.आय. सी.आय. बँक, शाखा अहिल्यानगर चा 2,87,000/- रुपयांचा धनादेश फिर्यादीला दिला होता. तो फिर्यादी संस्थेने वटण्यास बँकेत भरला असता अनादरीत झाला. त्यानुसार फिर्यादीने नि.इ.कलम 138 नुसार मा. न्यायालयात फिर्याद दाखल केला होती. संस्थेच्या वतीने अशोक दत्तात्रय तांबे यांची साक्ष महत्वाची ठरली. प्रकरणात दाखल केलेला कागदोपत्री पुरावा व फिर्यादीच्या वतीने ॲड. कौस्तुभ कुलकर्णी यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपीस दोषी धरण्यात आले. या कामी फिर्यादी संस्थेकडून ॲड. कौस्तुभ कुलकर्णी यांनी काम पाहिले. त्यांना निशांत सोनवणे, अतुल बोराडे, आदित्य रोकडे यांनी सहकार्य केले.
