• Thu. Jul 2nd, 2026

Mirrornews24

Marathi News

नवीन वर्षाचे प्रारंभ सार्वजनिक स्वच्छतेच्या संदेशाने

ByMirror

Jan 1, 2024

हरदिन मॉर्निंग ग्रुपने राबविले चांदबीबी महाल परिसरात स्वच्छता अभियान

नागरिकांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेची जागृती निर्माण झाल्यास रोगराईला आळा बसणार -संजय सपकाळ

अहमदनगर (प्रतिनिधी)- आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालविणाऱ्या हरदिन मॉर्निंग ग्रुपने नवीन वर्षाचे प्रारंभ सार्वजनिक स्वच्छतेचा संदेश देऊन केले. शहरा जवळ असलेल्या ऐतिहासिक चांदबीबी महाल परिसरात स्वच्छता अभियान राबविले. तर परिसरात लावण्यात आलेल्या झाडांना पाणी देऊन वृक्ष संवर्धनाचाही संदेश यावेळी देण्यात आला.


या अभियानात हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, मेजर दिलीप ठोकळ, अशोक दळवी, राजू रहेमान शेख, दिलीप गुगळे, नामदेव जावळे, विकास भिंगारदिवे, सर्वेश सपकाळ, जहीर सय्यद, सुमेश केदारे, प्रा. सलाबत खान, सिताराम परदेशी, रामनाथ गर्जे, अभिजीत सपकाळ, विलास तोतरे, सरदारसिंग परदेशी, दिनेश शहापूरकर, अशोकराव पराते, संपत बेरड, विठ्ठल राहिंज, जालिंदर अळकुटे, राजू कांबळे, नवनाथ वेताळ, कुमार धतुरे, महेश सरोदे, योगेश चौधरी आदींसह हरदिनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संजय सपकाळ म्हणाले की, हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून आरोग्य व पर्यावरण संवर्धनाची चळवळ चालवली जात आहे. प्रत्येकाचे जीवन आरोग्यमयी होण्यासाठी योग-प्राणायामाच्या माध्यमातून तर पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षरोपणाद्वारे हरदिन मॉर्निंग ग्रुप योगदान देत आहे. आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची असून, ग्रुपच्या माध्यमातून वर्षभर स्वच्छतेचे उपक्रम घेण्यात येतात.

नागरिकांमध्ये सार्वजनिक स्वच्छतेची जागृती निर्माण झाल्यास रोगराईला आळा बसणार असल्याचे स्पष्ट केले. तर ग्रुपच्या वतीने लावण्यात आलेल्या झाडांचे संवर्धनाचेही काम सुरु असल्याची माहिती त्यांनी दिली. ग्रुपच्या सदस्यांनी चांदबीबी महाल परिसरात पसरलेला प्लास्टिक पिशव्या, प्लास्टिक बॉटल व इतर मोठ्या प्रमाणात कचरा जमा करुन परिसराची स्वच्छता केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *