• Mon. Jul 27th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात रविवारी रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

ByMirror

Jan 10, 2025

स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती आणि राष्ट्रीय युवा सप्ताहाचा उपक्रम

नगर (प्रतिनिधी)- निमगाव वाघा (ता. नगर) येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ जयंती आणि राष्ट्रीय युवा सप्ताह निमित्त जिल्हा क्रीडा कार्यालय, श्री नवनाथ युवा मंडळ व स्व.पै. किसनराव डोंगरे बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने रविवारी (दि.12 जानेवारी) रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या विशेष घटक युवक कल्याण प्रशिक्षण शिबिर कार्यक्रमातंर्गत हा उपक्रम राबविण्यात येणार असून, सदर शिबिरात पंचक्रोशीतील ग्रामस्थांना सहभागी होण्याचे आवाहन युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे व डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी केले आहे.


रक्ताचा तुटवडा भरुन काढण्यासाठी व ग्रामीण भागातील नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. न्यू अर्पण ब्लड बँकच्या माध्यमातून रक्तदान शिबिर होणार आहे, तर डॉ. भाग्यश्री पवार ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करणार आहेत.

युवक-युवतींसह ग्रामस्थांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान करावे व ज्येष्ठ नागरिक व महिलांनी आरोग्य शिबिराचा लाभ घेण्याचे नाना डोंगरे यांनी म्हंटले आहे. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांचा यावेळी प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून सत्कार केला जाणार आहे. रक्तदान व आरोग्य शिबिरासाठी अशोक भालके, भाऊसाहेब डोंगरे, दादा डोंगरे, अनिल डोंगरे, राजू जाधव, बाळासाहेब गायकवाड, अतुल फलके, पिंटू जाधव आदी परिश्रम घेत आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *