• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

हुंडेकरी स्पोर्ट्‌स अकॅडमीच्या कार्तिक करांडेची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड

ByMirror

May 21, 2026
हुंडेकरी स्पोर्ट्‌स अकॅडमीच्या कार्तिक करांडेची महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड

DCCI च्या एलिट फिजिकल डिसेब्लिटी T20 चॅम्पियनशीपमध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार

अहिल्यानगर (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील हुंडेकरी स्पोर्ट्‌स अकॅडमीचा प्रतिभावान क्रिकेटपटू कार्तिक वैभव करांडे याची DCCI (डिफरंटली एबल्ड क्रिकेट कौन्सिल ऑफ इंडिया) आयोजित पाचव्या एलिट फिजिकल डिसेब्लिटी T20 चॅम्पियनशीप 2026 साठी महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाली आहे. कार्तिकच्या या निवडीमुळे अहिल्यानगरच्या क्रीडा क्षेत्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.


बंगळुरू येथे 17 मे ते 27 मे या कालावधीत होणाऱ्या डीसीसीआयच्या खुल्या वयोगटातील मुलांच्या प्रतिष्ठेच्या T20 क्रिकेट स्पर्धेत कार्तिक महाराष्ट्र राज्य डिसेब्लिटी क्रिकेट संघाचे तो प्रतिनिधित्व करणार आहे. देशभरातील विविध राज्यांतील गुणवंत खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने ही स्पर्धा अत्यंत महत्त्वाची मानली जाते. अशा दर्जेदार स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात स्थान मिळवणे हे कार्तिकच्या मेहनतीचे व गुणवत्तेचे मोठे यश आहे.


कार्तिक हा उजव्या हाताचा आक्रमक फलंदाज असून डावखुरा फिरकी गोलंदाज म्हणूनही त्याने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. मैदानावरील त्याचा आत्मविश्‍वास, सातत्यपूर्ण सराव आणि संघासाठी खेळण्याची जिद्द यामुळे त्याने अल्पावधीतच प्रशिक्षक आणि निवड समितीचे लक्ष वेधून घेतले. यापूर्वीही त्याने 14 व 16 वर्षांखालील मुलांच्या महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघटनेच्या आमंत्रित क्रिकेट स्पर्धेत विजय क्लब, पुणे संघाचे प्रतिनिधित्व करून उल्लेखनीय कामगिरी बजावली होती.


नियमित सराव, शिस्तबद्ध दिनचर्या आणि खेळावरील निष्ठा यामुळे त्याने प्रगती साधली आहे. तो सध्या अहिल्यानगर येथील हुंडेकरी स्पोर्ट्‌स अकॅडमीमध्ये प्रशिक्षक सरफराज बांगडीवाला यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. कार्तिकच्या या यशाबद्दल आमदार संग्राम जगताप, हुंडेकरी स्पोर्ट्‌स अकॅडमीचे संस्थापक वसीम हुंडेकरी यांच्यासह क्रीडा प्रेमींनी त्याचे अभिनंदन केले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *