• Wed. Oct 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

भिंगारचे नामांकित पैलवान सदाशिव भंडारी यांचे निधन

ByMirror

Oct 21, 2026
भिंगारचे नामांकित पैलवान सदाशिव भंडारी यांचे निधन

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील नामांकित पैलवान सदाशिव तुकाराम भंडारी यांचे नुकतेच निधन झाले. ते 98 वर्षाचे होते. जुन्या काळातील प्रसिध्द मल्ल असल्याने ते सर्वांना सुपरिचित होते. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.

त्यांच्या पश्‍चात तीन मुले, सुना, मुली, नातू, पणतू असा मोठा परिवार आहे. ते कै. प्रभाकर भंडारी, राजेंद्र भंडारी, ईश्‍वर भंडारी व संजय भंडारी यांचे वडिल होते. त्यांचा अंत्यविधी भिंगार येथील अमरधाम येथे झाला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *