• Mon. Oct 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

पारनेर येथे 20 व्या आंतर जिल्हा राष्ट्रीय ॲथलेटिक्स निवड चाचणी उत्साहात

ByMirror

Oct 12, 2026
13 गुणवंत खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!

13 गुणवंत खेळाडूंची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड!


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने आयोजित 20 व्या आंतर जिल्हा राष्ट्रीय ॲथलेटिक्स-अहिल्यानगर जिल्हा संघ निवड चाचणी (2026) पारनेर येथील ‘न्यू आर्टस्‌ कॉमर्स अँड सायन्स कॉलेज’च्या मैदानावर नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. या निवड चाचणीतून जिल्ह्याचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व करण्यासाठी 13 गुणवंत खेळाडूंची निवड करण्यात आली आहे.


या निवड चाचणीचे उद्घाटन अहिल्यानगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाच्या न्यू आर्टस्‌ कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कॉलेजचे क्रीडा संचालक प्रा. डॉ. संजय गायकवाड, एनसीसी (NCC) विभागप्रमुख प्रा. भरत डगळे, प्रा. गंगाराम खोडदे सर, न्यू इंग्लिश स्कूलचे क्रीडा प्रमुख तथा तालुका शालेय क्रीडा अध्यक्ष बापूराव होळकर सर, एम.ई.टी. स्कूलचे फिजिकल डायरेक्टर अक्षय शिंदे, आणि स्टेला मारीस हंगाचे ऋषीकेश औटी आदी मान्यवर उपस्थित होते.


स्पर्धेचे पंच व व्यवस्थापक म्हणून श्रीरामसेतू आवारी, संदीप घावटे, गुलजार शेख, बापूसाहेब गायकवाड, सौरभ वरखडे, समीर शेख, गणेश आघाडे, सतीश भालेराव आणि अरविंद दिवे यांनी चोख काम पाहिले.
राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेले 13 खेळाडूंची निवड करण्यात आलेली आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे पूर्ण भारत देशामधून प्रत्येक जिल्ह्यामधून 13 खेळाडूंचा संघ या ठिकाणी उपस्थित राहणार आहे. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सहभागी होणाऱ्या सर्व खेळाडूंची राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या स्पर्धेचे आयोजन ॲथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडिया व हैदराबाद सरकार करणार आहे.


निवड झालेले हे सर्व खेळाडू आगामी राष्ट्रीय स्पर्धा हैदराबाद (14 व 16 नोव्हेंबर 2026) येथे होणाऱ्या आंतर जिल्हा राष्ट्रीय ॲथलेटिक्स स्पर्धेत अहिल्यानगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील, अशी माहिती स्पर्धा आयोजक दिनेश भालेराव यांनी माहिती दिली. सर्व निवडक खेळाडूंचे अध्यक्ष सुनील जाधव, उपाध्यक्ष राजेंद्र कोतकर, प्रसाद डागवाले यांच्यासह अहिल्यानगर जिल्हा ॲथलेटिक्स संघटनेचे पदाधिकारी, क्रीडाप्रेमी व उपस्थितांनी अभिनंदन करून खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेतील पुढील कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *