थेट उपांत्यपूर्व फेरीत दाखल; रविवारी सातारा व छत्रपती संभाजीनगर विरुध्द सामना
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन (ADFA) यांच्या मान्यतेने अहिल्यानगर ज्युनियर बॉईज (अंडर-15) फुटबॉल संघ हा WIFA आंतरजिल्हा फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा 2025-26 (ज्युनियर बॉईज) मध्ये सहभागी होणार आहे. ही स्पर्धा दि. 12 मे ते 18 मे 2026 दरम्यान शिरपूर, जि. धुळे येथे आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी शुक्रवारी (दि.15 मे) संघ रवाना झाला आहे.
गतवर्षीच्या स्पर्धेत अहिल्यानगर संघाने उल्लेखनीय कामगिरी करत चौथे स्थान पटकावले होते. त्याच कामगिरीच्या जोरावर यावर्षी संघ थेट उपांत्यपूर्व (क्वार्टर फायनल) फेरीतून आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. अहिल्यानगर संघाचा सामना रविवारी (दि. 16 मे) सातारा व छत्रपती संभाजीनगर जिल्हा यांच्यातील विजेत्या संघाविरुद्ध होणार आहे.
या स्पर्धेसाठी निवड झालेल्या संघाचे अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, वरिष्ठ उपाध्यक्ष मनोज वाळवेकर, उपाध्यक्ष खालिद सय्यद, अमरजीतसिंग शाही, सचिव रोनप फर्नांडिस, सहसचिव प्रदीप जाधव व व्हिक्टर जोसेफ, खजिनदार रिशपाल सिंग परमार, सह खजिनदार रणबीर सिंग परमार तसेच कोअर कमिटी सदस्य राजू पाटोळे यांनी अभिनंदन करून संघास पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
संघाचे प्रशिक्षक जोनाथन जोसेफ तर संघ व्यवस्थापक जेव्हिअर स्वामी हे जबाबदारी सांभाळत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली संघ उत्कृष्ट कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनतर्फे संपूर्ण संघाला स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
–
अहिल्यानगर ज्युनियर बॉईज (अंडर-15) फुटबॉल संघ पुढीलप्रमाणे
अशोक चंद (कर्णधार), यदुवर कोकरे (उपकर्णधार), माहीर गुंदेचा, सौरभ खंडेलवाल, चिराग गोरे, ओम गाडे, ओम लोखंडे, इंद्रजित गायकवाड, कृष्णा भिसे, हर्षद सोनावणे, भार्गव पिंपळे, जय मुथा, गुणाध्य जाधव, आयुष गाडळकर, आदर्श साबळे, अंशुमन विधाते, देवांश झरेकर, मोक्ष गरदास, वीरेंद्र वीर, जोएल साठे.
