• Wed. Jul 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

अहिल्यानगर लीग चॅम्पियनशिप 2025-26 फुटबॉल लीगचा टप्पा यशस्वीरित्या पूर्ण

ByMirror

May 31, 2026
अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचा पुढाकार

अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशनचा पुढाकार


फिरोदिया शिवाजियन्स, बाटा, सुमन एंटरप्रायझेस व गुलमोहर फुटबॉल क्लब सुपर लीगसाठी पात्र; 30 जून पासून सुरू होणार सुपर लीग

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन (ADFA) आयोजित अहिल्यानगर लीग चॅम्पियनशिप 2025-26 चा लीग टप्पा यशस्वीरित्या पूर्ण झाला. जिल्ह्यातील एकूण 12 संघांनी स्पर्धेत सहभाग घेतला. अहमदनगर क्लब शेजारील भुईकोट किल्ला मैदान येथे 18 दिवस चाललेल्या या स्पर्धेत एकूण 36 सामने खेळविण्यात आले. सर्व संघांनी उत्कृष्ट खेळभावना आणि स्पर्धात्मक फुटबॉलचे दर्शन घडविले.


लीग फेरीअंती पुढील संघांनी सुपर लीगसाठी पात्रता मिळविली.
पूल A फिरोदिया शिवाजियन्स फुटबॉल क्लब, बाटा फुटबॉल क्लब
पूल B सुमन एंटरप्रायझेस फुटबॉल क्लब, गुलमोहर फुटबॉल क्लब
सुपर लीग सामने 30 जून पासून सुरू होणार असून, 2 जुलै रोजी होणारा अंतिम सुपर लीग सामना अहिल्यानगर लीग चॅम्पियनशिप विजेता निश्‍चित करणार आहे.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी अहमदनगर जिल्हा फुटबॉल असोसिएशन सर्व सहभागी संघ खेळाडू प्रशिक्षक फुटबॉलप्रेमी यांचे आभार मानले आहे.


स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी विशेष परिश्रम घेतल्याबद्दल संयुक्त सचिव व्हिक्टर जोसेफ व कार्यकारिणी सदस्य झेवियर स्वामी तसेच अभय साळवे, अभिषेक सोनवणे, सचिन पात्रे, वैभव मनोदिया आणि राजेश अँथनी यांचे असोसिएशनतर्फे विशेष कौतुक करण्यात आले.


स्पर्धेतील सर्व सामने यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल फुटबॉल असोसिएशन रेफरी पॅनेलचेही विशेष आभार मानण्यात आले. या पॅनेलमध्ये जॉय जोसेफ, प्रकाश कनोजिया, वैभव मनोदिया, शशांक वाल्मिकी, अक्षय बोराडे, रितेश रणमाळे, महेश पाटेकर, अभिषेक सोनवणे, अभय साळवे, जॉय शेळके, सुमित कुमारसिंह, भूषण गवळी, प्रियंका अवारे, सोनिया दोसानी, पूजा भिंगारदिवे, आणि मनीष कुमार सिंह यांचा समावेश होता. अहिल्यानगरमधील फुटबॉलप्रेमींनी सुपर लीगच्या रोमांचक सामन्यांना उपस्थित राहावे असे आवाहन असोसिएशनतर्फे करण्यात आले आहे.


–—
सुपर लीग वेळापत्रक पुढीलप्रमाणे:-
30 जून
फिरोदिया शिवाजियन्स FC विरुद्ध गुलमोहर FC सायं. 4.00
सुमन FC विरुद्ध बाटा FC सायं. 5.20
1 जुलै
सुमन FC विरुद्ध गुलमोहर FC सायं. 4.00
फिरोदिया शिवाजियन्स FC विरुद्ध बाटा FC सायं. 5.20
2 जुलै
बाटा FC विरुद्ध गुलमोहर FC sायं. 4.00
फिरोदिया शिवाजियन्स FC विरुद्ध सुमन FC सायं. 5.20
सर्व सामने वेळेवर सुरू होतील.
लीग टप्प्यातील सर्व पिवळी कार्डे रद्द करण्यात आली असून, ती पुढे ग्राह्य धरली जाणार नाहीत. सर्व संघांनी शिस्तीचे काटेकोर पालन करण्याचे सांगण्यात आले आहे. सामन्यांचा कालावधी 40-7-40 असा राहणार आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *