• Thu. Jun 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

वाढत्या साथीच्या आजाराच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांची आरोग्य तपासणी

ByMirror

Oct 18, 2023

तथागत बुद्धिस्ट सोसायटीचा उपक्रम

रुग्णांच्या विविध मोफत तपासण्या करुन गरजूंना औषधाचे वाटप

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरात वाढत्या साथीच्या आजाराच्या पार्श्‍वभूमीवर तथागत बुद्धिस्ट सोसायटीच्या (इंडिया) वतीने सर्वरोग तपासणी शिबिर घेण्यात आले. रेल्वे स्टेशन रोड, शिवनेरी चौकात झालेल्या या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. रुग्णांच्या विविध मोफत तपासण्या करुन गरजूंना औषधाचे देखील वाटप करण्यात आले.


किशोर जेजुरकर यांच्या पुढाकाराने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष संजय कांबळे, डॉ. विश्‍वास गायकवाड, डॉ. हमेद बेग, डॉ. सत्यम शर्मा, रक्त तपासणीस शुभम पाटोळे, आण्णासाहेब गायकवाड, प्रमोद शिंदे, अश्‍पाक शेख, विशाल कांबळे, विजितकुमार ठोंबे, सिंध्दात कांबळे मिलिंद आंग्रे, विशाल परदेशी, ओंकार निक्रट आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


संजय कांबळे म्हणाले की, समाज निरोगी करण्यासाठी आरोग्य चळवळ उभी करण्याची गरज असून समाजात आरोग्याचे प्रश्‍न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. साथीच्या आजारामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मोठी झळ बसत असून, त्यांच्या सोयीसाठी या शिबिराचे आयोजन केले गेले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


डॉ. विश्‍वास गायकवाड म्हणाले की, तथागत बुद्धिस्ट सोसायटीची सामाजिक चळवळ दिशादर्शक आहे. सर्वसामान्यांचा विचार करुन विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहे. या शिबिराच्या माध्यमातून सर्वसामान्यांना आधार मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले.


या शिबिरात डॉ. विश्‍वास गायकवाड व डॉ. हमेद बेग यांनी दोनशेपेक्षा जास्त नागरिकांची तपासणी केली. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड, गुडघेदुखी, कंबर दुखी, अंगदुखी, खोकला, ताप, डेंगू, गोचीड ताप, टायफाईड आदी सर्व रोगांची तपासणी करुन रक्त, लघवी तपासणीसह विविध चाचण्या देखील मोफत करण्यात आल्या. या शिबिराचे नियोजन करणारे किशोर जेजुरकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. शिबिरास उत्कर्षा क्लिनिकचे विशेष सहकार्य लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *