• Thu. Jun 18th, 2026

Mirrornews24

Marathi News

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नर्सिंग महाविदयालयात जागतिक संधिवात दिवस साजरा

ByMirror

Oct 17, 2023

स्नायू हाडांचे आजारांसह जगणे या विषयावर मार्गदर्शन

अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नर्सिंग महाविदयालयात जागतिक संधिवात दिवस साजरा करुन संधिवात आजाराची जागृती करुन त्यावर उपचार पध्दतीची माहिती देण्यात आली. मेडिकल सर्जिकल नर्सिंग विभागातंर्गत या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


विळदघाट येथील डॉ. विठ्ठलराव विखे पाटील नर्सिंग महाविदयालयात झालेल्या कार्यक्रमात स्नायू हाडांचे आजारांसह जगणे या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात अले होते. यामध्ये डॉ. विखे पाटील हॉस्पिटलचे ऑर्थोपेडीक विभागाचे प्रमुख डॉ. दिपक नाईकवाडे यांनी मार्गदर्शन करुन संधिवात आजाराची माहिती देऊन रुग्णांना आहार, व्यायामाबद्दल सविस्तर सांगितले.


या कार्यक्रमासाठी डॉ. प्रतिभा चांदेकर, उपप्राचार्या डॉ. योगिता औताडे यांच्या मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. यावेळी सहाय्यक प्राध्यापक निलेश म्हस्के, सहाय्यक प्राध्यापिका पल्लवी कोळपकर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मेडिकल सर्जिकल विभागाचे प्रमुख प्राध्यापक अमोल टेमकर, क्लिनीकल प्रशिक्षक प्रमोद सूर्यवंशी, पुजा मोरे, रूषाली कुंजीर, डॉरथी पवार, सहाय्यक प्राध्यापिका वर्षा शिंदे यांचे सहकार्य लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *