• Tue. Jun 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

मनगाव प्रकल्पाला दहिवाळ सराफ परिवाराच्या वतीने किराणा भेट

ByMirror

Oct 20, 2023

दहिवाळ परिवार मनगावच्या मुलांमध्ये रममाण

अहमदनगर (प्रतिनिधी)- भान हरवलेल्या, मनोरुग्ण निराधार महिलांचा सांभाळ करणाऱ्या माऊली प्रतिष्ठान संचलित मनगाव प्रकल्पाला दहिवाळ सराफ परिवाराच्या वतीने किराणा साहित्याची भेट देण्यात आली. नवनाथभाऊ दहिवाळ यांच्या संकल्पनेतून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.


तर मनगाव प्रकल्पातील चिमुकल्यांना खाऊचे वाटप करुन, दहिवाळ परिवार मुलांमध्ये रममाण झाले होते. दहिवाळ सराफच्या माध्यमातून व्यवसायाला सामाजिक उपक्रमाची जोड देऊन वर्षभर विविध उपक्रम राबविण्यात येतात. तर सण-उत्सवानिमित्त महिलांसाठी दहिवाळचे उपक्रम एक पर्वणी ठरत असते. धार्मिक व सामाजिक क्षेत्रात योगदान देताना गरजूंना मदतीचा हात दिला जात आहे. सामाजिक जाणीव ठेऊन समाजाचे ऋण फेडण्यासाठी दहीवाळ परिवार कटिबध्द असल्याची भावना नवनाथभाऊ दहिवाळ यांनी व्यक्त केली.


या सामाजिक उपक्रमाप्रसंगी अरुणा दहिवाळ, नितीन दहिवाळ, सचिन दहिवाळ, बंडू भिसे, अनिल उदावंत, डॉ. राजेंद्र धामणे, साईराज दहिवाळ, शंभूराज दहिवाळ, देवांश दहिवाळ, स्वरा दहिवाळ, ओवी दहिवाळ, शितल दहिवाळ, पूजा दहिवाळ आदींसह दहिवाळ परिवारातील सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *