• Tue. Jun 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

निमगाव वाघात नवरात्र उत्सवानिमित्त मंदिर परिसरात स्वच्छता अभियान

ByMirror

Oct 19, 2023

साथीचे आजार रोखण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची -पै. नाना डोंगरे

अहमदनगर (प्रतिनिधी)- निरोगी आरोग्यासाठी सार्वजनिक स्वच्छता महत्त्वाची असून, सर्वांनी योगदान दिल्यास स्वच्छ भारताचे स्वप्न साकारले जाणार आहे. आपल्या परिसराची स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे. साथीच्या आजारांची साथ सुरू असून, डासांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी स्वच्छतेला महत्त्व देण्याचे आवाहन डोंगरे संस्थेचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी केले.


नवरात्र उत्सवानिमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथील बिरोबा मंदिर परिसरात नेहरू युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न स्व.पै. किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ आणि धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने स्वच्छता अभियान राबविण्यात आले. स्वच्छता ही सेवा कार्यक्रमांतर्गत राबविण्यात आलेल्या या उपक्रमाप्रसंगी सुरेश जाधव, विकास निकम, युवा मंडळाचे अध्यक्ष पै. संदीप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, नामदेव भुसारे, प्रमोद थिटे, प्रियंका डोंगरे-ठाणगे, मंदाताई डोंगरे आदींसह शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.


पुढे डोंगरे म्हणाले की, संस्थेच्या माध्यमातून वर्षभर सार्वजनिक स्वच्छतेसाठी कार्य सुरु आहे. विविध सण-उत्सव सामाजिक उपक्रम राबवून युवक व विद्यार्थ्यांना दिशा देण्याचे कार्य सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.


बिरोबा मंदिर परिसरात घेण्यात आलेल्या स्वच्छता अभियानात शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगण्यात आले. तर पर्यावरणाला घातक ठरत असलेल्या व देशापुढे मोठी समस्या असलेल्या प्लास्टिक कचरा मुक्तीचा संदेश देण्यात आला. या अभियानाद्वारे विद्यार्थी व उपस्थितांनी मंदिर परिसरात वाढलेले गवत, काटेरी झाडे-झुडपे हटवून, झाडांचा पालापाचोळा हटवून परिसर स्वच्छ केले. या उपक्रमासाठी नेहरु युवा केंद्राचे उपनिदेशक शिवाजी खरात व जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीपराव दिघे यांचे मार्गदर्शन लाभले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *