• Tue. Jun 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

बालघर प्रकल्पात रंगली अनाथ व दुर्बल घटकातील मुलांची चित्रकला स्पर्धा

ByMirror

Oct 22, 2023

चैतन्य महावतार बाबाजी सेवा ट्रस्टचा उपक्रम

वंचित घटकातील मुलांना आधार देण्याबरोबरच त्यांना समाजात उभे करण्यासाठी संस्था प्रयत्नशील -संतोष गोटीपामुल

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील चैतन्य महावतार बाबाजी सेवा ट्रस्टच्या वतीने तपोवन रोड येथील बालघर प्रकल्पातील अनाथ व दुर्बल घटकातील मुलांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आली. ट्रस्टच्या स्थापना दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या चित्रकला स्पर्धेत आपल्या कल्पना शक्तीने कागदावर विद्यार्थ्यांनी रंगांची उधळण करीत विविध चित्र रेखाटले.


विद्यार्थ्यांनी स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन आपल्या आवडीप्रमाणे चित्रे रेखाटली. या स्पर्धेतून मुलांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले होते. चित्रकलेच्या स्पर्धेनंतर निकाल जाहीर करुन कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे अन्न निरीक्षक पवार यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे बक्षीसे देण्यात आली.


प्रकल्पाचे संस्थापक युवराज गुंड यांनी बालघरची माहिती देऊन चैतन्य महावतार बाबाजी सेवा ट्रस्टने राबविलेल्या उपक्रमाचे कौतुक केले. अनेक संस्था विद्यार्थ्यांना मदत घेऊन येतात, मात्र या संस्थेने विद्यार्थ्यांना मदतीबरोबरच त्यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण करुन त्यांच्या कलागुणांना चालना देण्याचे काम केले असल्याचे सांगितले.


चैतन्य महावतार ट्रस्टचे अध्यक्ष संतोष गोटीपामुल म्हणाले की, वंचित घटकातील मुलांना आधार देण्याबरोबरच त्यांना समाजात उभे करण्यासाठी योग्य दिशा व प्रोत्साहन देण्याची गरज आहे. त्यांच्याकडे कमीपणाने न पाहता त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. गरजू घटकातील विद्यार्थ्यांसाठी ट्रस्टच्या माध्यमातून विविध उपक्रम सुरु असून, विद्यार्थ्यांना फक्त मदत न देता कलागुणांना प्रोत्साहन व त्यांच्यात संस्कार निर्माण करण्याचे काम केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेचे परीक्षण संतोष गोटीपामुल यांनी केले. पाहुण्यांचे स्वागत सचिव सुजाता गोटीपामुल व श्रेया गोटीपामुल यांनी केले. चित्रकला स्पर्धेच्या बक्षीस वितरणानंतर विद्यार्थ्यांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *