• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

सावेडीत महिला व्यावसायिक कार्यशाळेचे आयोजन

ByMirror

Dec 8, 2022

महिलांना दिले जाणार फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण

यशोधन बहुउद्देशीय संस्थेचा महिलांना आत्मनिर्भर करण्याचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील यशोधन बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने महिलांना आत्मनिर्भर करण्याच्या उद्देशाने महिला व्यावसायिक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यशाळेच्या माध्यमातून महिलांना फॅशन डिझायनिंगचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा दीपिका भोस यांनी दिली.


महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी सावेडी येथील भिस्तबाग, विठ्ठलनगर येथे या प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. 21 दिवसीय या प्रशिक्षण शिबिरात महिलांना बेसिक व ऍडव्हान्स कोर्सच्या माध्यमातून महिलांच्या विविध पारंपारिक व फॅशनेबल कपडे शिवण्याचे प्रशिक्षण जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झालेल्या महिला युवतींना स्वत:चा व्यवसाय सुरु करुन चांगल्या प्रकारे रोजगार देखील उपलब्ध होणार आहे. आर्थिक सक्षम होऊन विकास साधण्यासाठी महिलांनी व्यावसायिक प्रशिक्षण घेण्याचे आवाहन दीपिका भोस यांनी केले आहे.


संस्थेच्या वतीने महिलांसाठी विविध व्यावसायिक प्रशिक्षण राबविण्यात येत असून, शिका आणि कमवा या उद्देशाने या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 9960958736 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *