सर्व सुविधायुक्त परवडणारी नवीन ग्लान्झा ग्राहकांच्या पसंतीस उतरणार -आमदार जगताप
अहमदनगर (प्रतिनिधी)- ग्राहक वर्गाच्या प्रतिक्षेत असलेली सीएनजीयुक्त टोयोटाच्या नवीन ग्लान्झाचे अनावरण केडगाव इंडस्ट्रीयल इस्टेट येथील वासन टोयोटा शोरुममध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. भारतीय वाहन बाजारात सीएनजी वाहनांची मागणी वाढत असताना अद्यावत सोयी-सुविधांनीयुक्त प्रीमियम हचबॅक असलेली ही नवीन ग्लान्झा ग्राहकांना भुरळ घालत आहे.
या कार अनावरणप्रसंगी घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, प्रीतपालसिंह धुप्पड, शोरुमचे जनक आहुजा, उद्योजक इंद्रजीतशेठ नय्यर, रवींद्र बक्षी, जय रंगलानी, राजीव बिंद्रा, हरमोहनसिंग सेठी, राकेश गुप्ता, प्रदीप पंजाबी, अभिमन्यू नय्यर, राजेंद्र कंत्रोड, अनिश आहुजा, दलजितसिंह वधवा, विपुल शहा, डॉ. प्रविण मुनोत, लोकेश मेहतानी, पप्पू भुतकर, अर्जुन मदान, किशोर मुनोत, कैलाश नवलानी, जालिंदर बोरुडे, शोरुमची सेल्स टिम दीपक जोशी, रविंद्र थोरात, प्रविण जोशी आदींसह ग्राहक वर्ग व विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, बदलते तंत्रज्ञान व कारचे आकर्षक लुक ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहे. पेट्रोलचे वाढते दरामुळे सीएनजी वाहनांची मागणी वाढली आहे. सीएनजीयुक्त, व उत्तम मायलेज असलेल्या नवीन ग्लान्झा ग्राहकांच्या पसंतीस उतरणार असून, ही कार सर्वसामान्यांसाठी परवडणारी असल्याचे त्यांनी सांगितले.

या नवीन ग्लान्झाची आरंभ किंमत 8.43 लाखापासून सुरू आहे. सीएनजीचा मायलेज 30. 61 किलोमीटर असल्याचा दावा कंपनीने केला आहे. 170 एम.एम. चा ग्राउंड क्लिअरन्स, डायमंड कट आलाय व्हील, सात इंची म्युझिक सिस्टम, अँड्रॉइड अॅटो आणि अॅप्पल कार प्ले, पुश बटन स्टार्ट या सुविधा उपलब्ध करुन देण्यात आले आहे. तर 1.2 लीटर 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन व 5 स्पीड मॅन्यूअल गिअरबॉक्स देण्यात आला आहे. ही कार कॅफे व्हाईट, गेमिंग ग्रे, इंटिसिंग सिल्वर, स्पोर्टी रेड आणि इन्सटा ब्लू या पाच कलर मध्ये उपलब्ध असल्याची माहिती अनिश आहुजा यांनी दिली.
ही कार पाहण्यासाठी व टेस्ट ड्राईव्हसाठी शोरुमला भेट देण्याचे आवाहन वासन टोयोटाच्या वतीने करण्यात आले आहे.

