• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

सोना प्रोफेशनल ब्युटी इन्स्टिट्यूटच्या दुसर्‍या शाखेचा शुभारंभ

ByMirror

Dec 15, 2022

महिलांना दिले जाणार अद्यावत पार्लरचे प्रशिक्षण

महिलांनी व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर होणे काळाची गरज -ज्योती गाडे

अहमदनगर (प्रतिनिधी)- महिला व युवतींना पार्लरच्या माध्यमातून स्वयंरोजगार उपलब्ध करुन देणार्‍या सोना प्रोफेशनल ब्युटी इन्स्टिट्यूट गुलमोहर रोड, पारिजात कॉर्नर येथील दुसर्‍या शाखेचे उद्घाटन नगरसेविका ज्योती गाडे यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी महापौर शीला शिंदे, नगरसेविका रूपाली वारे, नगरसेवक प्रकाश भागानगरे, इन्स्टिट्यूटच्या संचालिका भारती भगत, वैशाली चिपाडे, गीतांजली चिपाडे, ज्योती भुसार आदी उपस्थित होते.


नगरसेविका ज्योती गाडे म्हणाल्या की, महिला आर्थिक सक्षम झाल्यास त्या कुटुंबाचा विकास साधला जातो. विविध व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन आत्मनिर्भर होणे काळाची गरज बनली आहे. पार्लरच्या माध्यमातून अनेक महिला स्वयंपूर्ण झाल्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


भारती भगत यांनी महिलांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून पार्लरचे विविध व्यावसायिक प्रशिक्षण दिले जात आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त महिलांना प्रशिक्षण दिले जात आहे.

महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा केंद्राशी (मुंबई)हे इन्स्टिट्यूट संलग्न असून, महिलांना पार्लर प्रशिक्षणाचे अधिकृत प्रमाणपत्र देखील दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. तर हबीब हर्बलच्या सर्व ब्युटी प्रॉडक्टची डिस्ट्रीब्यूटर शिप सोना प्रोफेशनल ब्युटी इन्स्टिट्यूटकडे असल्याची त्यांनी माहिती दिली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *