• Tue. Nov 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

दिवाळीआधीच किंग्स मेन्स वेअर कडून ग्राहकांना बक्षिसांची पर्वणी!

ByMirror

Nov 3, 2026
पहिला लकी ड्रॉ उत्साहात, दुसऱ्या सोडतीसाठीही ग्राहकांना संधी!

पहिल्या लकी ड्रॉमध्ये 12 आकर्षक भेटवस्तूंची सोडत; खरेदीसोबत बक्षिसांची संधी


पहिला लकी ड्रॉ उत्साहात, दुसऱ्या सोडतीसाठीही ग्राहकांना संधी!


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सणासुदीच्या काळात कपड्यांच्या खरेदीसोबत आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी मिळाल्यास ग्राहकांचा आनंद द्विगुणित होतो. हाच अनुभव अहिल्यानगरच्या कापड बाजारातील तेली खुंट परिसरातील किंग्स मेन्स वेअर या दालनाच्या माध्यमातून ग्राहकांना मिळत आहे. ग्राहकांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष लकी ड्रॉ उपक्रमाची पहिली सोडत 2 नोव्हेंबर रोजी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सोडतीमध्ये वॉशिंग मशीन, टीव्ही, सायकल, होम थिएटर यांसह एकूण 12 आकर्षक बक्षिसांचा समावेश होता.


ग्राहकांना खरेदीचा आनंद देण्यासोबतच त्यांच्यासाठी काहीतरी विशेष करण्याच्या उद्देशाने किंग्स मेन्स वेअरचे संचालक निखिल क्षेत्रे आणि सागर परदेशी यांनी या लकी ड्रॉ उपक्रमाचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत दालनातून 500 रुपयांपासून पुढे खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सहभागी होण्याची संधी देण्यात आली होती. त्यामुळे दिवाळीच्या खरेदीदरम्यान ग्राहकांना खरेदीसोबत बक्षिसे जिंकण्याचीही संधी उपलब्ध झाली.


संचालक निखिल क्षेत्रे आणि सागर परदेशी यांच्या उपस्थितीत पहिल्या लकी ड्रॉची सोडत काढण्यात आली. विशेष म्हणजे, या सोडतीमध्ये पारदर्शकता राहावी आणि ग्राहकांनाही संपूर्ण प्रक्रिया पाहता यावी, यासाठी लकी ड्रॉचे थेट प्रक्षेपण (LIVE) करण्यात आले. ग्राहकांच्या हस्ते सोडत काढण्यात आल्याने या उपक्रमाला विशेष स्वरूप प्राप्त झाले.
या लकी ड्रॉमध्ये प्रथम क्रमांकासाठी वॉशिंग मशीन, द्वितीय क्रमांकासाठी टीव्ही, तृतीय क्रमांकासाठी सायकल, तर चौथ्या क्रमांकासाठी होम थिएटर अशी आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती. याशिवाय इतरही भेटवस्तूंचा समावेश असून, एकूण 12 बक्षिसांच्या माध्यमातून ग्राहकांना आनंदाची संधी देण्यात आली. विशेष म्हणजे, सर्व बक्षिसांना वॉरंटी आणि गॅरंटी असल्याची माहिती दालनाच्या वतीने देण्यात आली.


पहिल्या सोडतीनंतर आता ग्राहकांसाठी दुसऱ्या लकी ड्रॉची संधीही उपलब्ध करून देण्यात आली आहे. 2 नोव्हेंबरपासून दुपारी 12 वाजता दुसऱ्या लकी ड्रॉसाठी सुरुवात करण्यात आली असून, दालनातून निर्धारित रकमेची खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या उपक्रमात सहभागी होता येणार आहे. ग्राहकांचा विश्‍वास, खरेदीचा आनंद आणि सणासुदीच्या उत्साहाला जोड देण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमामुळे किंग्स मेन्स वेअर मध्ये दिवाळी खरेदीला विशेष आकर्षण निर्माण झाले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *