ग्राहकांना प्रत्येक गाडीसोबत ‘वृक्ष भेट’ देऊन हरित शहराचा व पर्यावरण संवर्धनाचा संदेश
अत्याधुनिक ‘TVS iQube S15’ चे दिमाखदार लाँचिंग
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक आणि इंधन खर्चाची शंभर टक्के बचत करणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. झोपडी कॅन्टीन परिसरातील शिवम टीव्हीएस (बीएस शिवम) शोरूममध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘महा डिलिव्हरी सोहळ्या’त एकाच वेळी तब्बल 55 इलेक्ट्रिक स्कूटर्सचे वितरण करण्यात आले. ‘TVS iQube’ आणि ‘TVS Orbiter’ या अत्याधुनिक इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या वितरणासह टीव्हीएस कंपनीच्या बहुप्रतिक्षित ‘TVS iQube S15 4.7’ या नवीन मॉडेलचे अनावरण करण्यात आले. वाहन घेणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला वृक्ष भेट देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश देऊन हरित शहर उपक्रमाला हातभार लावण्याचे आवाहन करण्यात आले.
अहिल्यानगर महानगरपालिकेचे उपमहापौर ॲड. धनंजय जाधव, नगरसेवक किरण कराळे, शिवम टीव्हीएसचे संचालक आप्पासाहेब होळे, स्वप्नील होळे आणि आकाश होळे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी बोलताना उपमहापौर ॲड. धनंजय जाधव यांनी शिवम टीव्हीएसच्या उपक्रमाचे कौतुक करत सांगितले की, “अहिल्यानगरला हरित आणि प्रदूषणमुक्त शहर बनविण्यासाठी प्रशासन आणि नागरिकांच्या सहभागातून विविध उपक्रम राबविले जात आहेत. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढविणे ही काळाची गरज आहे. प्रत्येक ग्राहकाला वाहनासोबत वृक्ष भेट देऊन पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला आहे. हा उपक्रम शहराच्या हरित विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवक किरण कराळे यांनीही इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या वापराचे स्वागत केले. ते म्हणाले, “इलेक्ट्रिक वाहने ही केवळ पर्याय नसून भविष्यातील गरज आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञान, कमी खर्च आणि पर्यावरण संरक्षण यामुळे नागरिकांचा ईव्हीकडे कल वाढत आहे. एकाच दिवशी 55 वाहनांची डिलिव्हरी आणि नवीन मॉडेलचे लाँचिंग हे ग्राहकांनी शिवम टीव्हीएसवर दाखविलेल्या विश्वासाचे प्रतीक आहे.”
कार्यक्रमाचे प्रमुख आयोजक आणि शिवम टीव्हीएसचे संचालक आप्पासाहेब होळे यांनी ग्राहकांचे आभार मानताना सांगितले की, “अहिल्यानगरकरांनी आमच्यावर दाखविलेल्या विश्वासामुळेच आज हा ऐतिहासिक क्षण अनुभवता आला आहे. ग्राहकांना वाहन विक्रीबरोबरच उत्कृष्ट विक्रीनंतरची सेवा देण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. 55 इलेक्ट्रिक वाहनांचे एकाच दिवशी वितरण करणे हा आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. व्यवसायासोबत सामाजिक जबाबदारी जपत प्रत्येक ग्राहकाला वृक्ष भेट देण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात सर्व 55 नवीन वाहनधारकांचा मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. ग्राहकांना वाहनांच्या डिजिटल किल्ल्या आणि वृक्ष भेट देण्यात आले. आपल्या नवीन इलेक्ट्रिक वाहनाचा ताबा घेताना ग्राहकांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि उत्साह पाहण्यासारखा होता. याशिवाय कार्यक्रमादरम्यान नागरिकांसाठी ‘ईव्ही जागरूकता अभियान’ आणि टेस्ट राईडचे आयोजन करण्यात आले होते. अनेक नागरिकांनी नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्सची चाचणी घेत आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती जाणून घेतली. इलेक्ट्रिक वाहनांचे फायदे, कमी देखभाल खर्च, पर्यावरणपूरक वैशिष्ट्ये आणि दीर्घकालीन बचत याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अखेरीस सर्व ग्राहक, मान्यवर आणि शोरूमच्या कर्मचाऱ्यांचे भव्य सामूहिक छायाचित्र घेण्यात आले. तसेच उपस्थितांसाठी अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती. या ऐतिहासिक महा-डिलिव्हरी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनामागे शिवम टीव्हीएसच्या संपूर्ण टीमचे योगदान महत्त्वाचे ठरले. जनरल मॅनेजर आकाश शिंदे, ईव्ही सेल्स मॅनेजर शकील शेख तसेच सेल्स एक्झिक्युटिव्ह रोहित मोरे, दत्ता मिसाळ आणि पूजा मॅडम यांनी कार्यक्रमाचे नियोजन, ग्राहक समन्वय, वाहन वितरण व्यवस्था आणि ईव्ही जागरूकता उपक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

