आमदार संग्राम जगताप, ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम यांच्या हस्ते अनावरण; इलेक्ट्रिक वाहनासोबत घरासाठी सोलर मिळणार मोफत
पर्यावरणाच्या दृष्टीने आणि काळाची गरज ओळखून अर्बन क्रूझर एबेला सर्वोत्तम ठरणार -आ. संग्राम जगताप
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- केडगाव इंडस्ट्रियल इस्टेट (एमआयडीसी) येथील वासन टोयोटा शोरूममध्ये गुरुवारी (दि. 17 सप्टेंबर) टोयोटाच्या नव्या अर्बन क्रूझर एबेला या इलेक्ट्रिक कार मॉडेलचे उत्साहात अनावरण करण्यात आले. आमदार संग्राम जगताप आणि ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम (आळंदी) यांच्या हस्ते या कारचे अनावरण झाले. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमती तसेच पर्यावरण संवर्धनाचा वाढता प्रश्न लक्षात घेऊन इलेक्ट्रिक वाहनांकडे ग्राहकांचा कल वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर टोयोटाने अर्बन क्रूझर एबेला हे पूर्णपणे इलेक्ट्रिक मॉडेल बाजारात आणले आहे. आधुनिक तंत्रज्ञान, आकर्षक डिझाइन, आरामदायी सुविधा आणि सुरक्षा वैशिष्ट्यांचा समावेश या वाहनात करण्यात आला आहे.
या अनावरण सोहळ्यास मधुकर लगड, सिद्धेश्वर देशमुख, कृषी अधिकारी संदीप बोधगे, वासन टोयोटाचे जनक आहुजा, अनिश आहुजा, दीपक दाते तसेच कंपनीची संपूर्ण सेल्स टीम उपस्थित होती.
आमदार संग्राम जगताप म्हणाले की, पर्यावरणाच्या दृष्टीने आणि काळाची गरज ओळखून टोयोटाने आकर्षक आणि उत्तम बनावटीची अर्बन क्रूझर एबेला बाजारपेठेत आणली आहे. टोयोटाने अनेक वर्षांपूर्वी हायब्रीड कारची संकल्पना ग्राहकांसमोर आणली होती. आता पूर्णपणे इलेक्ट्रिक मॉडेल बाजारात आणल्याने ग्राहकांचा या वाहनाला चांगला प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. घरगुती सौरऊर्जेच्या माध्यमातून नागरिकांना पर्यावरणपूरक जीवनशैलीकडे वळण्यासाठी कंपनीकडून प्रोत्साहन दिले जात असल्याचेही जगताप यांनी नमूद केले. इलेक्ट्रिक वाहनांसोबत सौरऊर्जेचा वापर वाढल्यास इंधनासोबतच विजेच्या खर्चातही बचत होण्यास मदत होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.
अनिश आहुजा म्हणाले की, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अर्बन क्रूझर एबेला खरेदी करणाऱ्या ग्राहकांना घरासाठी सोलर मोफत देण्याची सुविधा देण्यात आली आहे. इलेक्ट्रिक वाहनामुळे इंधनाची बचत होण्यासोबतच पर्यावरणाचे संरक्षण करण्यास हातभार लागणार आहे. वाढत्या इंधन दरांच्या पार्श्वभूमीवर ही कार ग्राहकांसाठी एक पर्याय ठरू शकते, असे त्यांनी सांगितले.
जनक आहुजा यांनी टोयोटा अर्बन क्रूझर एबेला कार ग्राहकांच्या टेस्ट ड्राइव्हसाठी वासन टोयोटा शोरूममध्ये उपलब्ध आहे. इच्छुक ग्राहकांनी शोरूमला भेट देऊन कारची माहिती तसेच टेस्ट ड्राइव्हचा अनुभव घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
अर्बन क्रूझर एबेलामध्ये कंपनीच्या दाव्यानुसार, या बॅटरी पर्यायांची अनुक्रमे 440 किमी आणि 543 किमीपर्यंतची रेंज आहे. जी इतर वाहनाच्या तुलनेत सर्वोत्तम आहे. 10.1-इंच टचस्क्रीन, वायरलेस Apple CarPlay आणि Android Auto, 18-इंच अलॉय व्हील्स, LED हेडलाइट्स व DRLs, रेन-सेंसिंग वायपर, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोलशी संबंधित कनेक्टेड फंक्शन्स, फ्रंट सीट व्हेंटिलेशन आणि 40:20:40 स्प्लिट रिअर सीट्स देण्यात आल्या आहेत. याशिवाय एअर प्युरिफायर, कनेक्टेड कार/i-CONNECT फंक्शन्स, स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी आणि रिमोट AC तसेच वाहन नियंत्रणाची सुविधाही उपलब्ध आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने व्हेरिएंटनुसार फ्रंट व रिअर पार्किंग सेन्सर्स, TPMS (टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम), मल्टिपल एअरबॅग्स आणि इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक यांसारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहेत. उच्च श्रेणीतील व्हेरिएंटमध्ये ॲडॅप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन-कीप असिस्ट, आपत्कालीन व सुरक्षा अलर्ट तसेच टोयोटाची ड्रायव्हर-असिस्टन्स प्रणाली उपलब्ध आहे. कारमध्ये लेव्हल-2 ADAS, 360-डिग्री कॅमेरा आणि 7 एअरबॅग्स यांसारख्या सुरक्षा सुविधांचाही समावेश आहे.
अर्बन क्रूझर एबेला 49 kWh आणि 61 kWh अशा दोन बॅटरी पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. वाहनाची कमाल पॉवर 174 hp पर्यंत असून, यात पाच प्रवाशांसाठी आसनव्यवस्था आहे. हे वाहन फ्रंट-व्हील ड्राइव्ह प्रणालीवर आधारित आहे. 61 kWh क्षमतेच्या E3 व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत ₹23.60 लाख असल्याची माहिती देण्यात आली. JBL ऑडिओ, पॅनोरामिक रूफ, व्हेंटिलेटेड फ्रंट सीट्स आणि वायरलेस कनेक्टिव्हिटी यांसारख्या सुविधाही वाहनात आहेत.
टोयोटाच्या दाव्यानुसार, DC फास्ट चार्जरच्या माध्यमातून वाहनाची बॅटरी 10 ते 80 टयांपर्यंत सुमारे 45 मिनिटांत चार्ज करता येते.

