• Fri. Jun 26th, 2026

Mirrornews24

Marathi News

उर्दू शायर गनी मोहम्मद शेख यांचे निधन

ByMirror

Oct 3, 2022

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रसिद्ध ज्येष्ठ उर्दू शायर कवी हाजी गनी मोहम्मद शेख (वय 86) यांचे नुकतेच वृध्दापकाळाने निधन झाले. स्वातंत्र्यपूर्व काळात जन्मलेले गनी मोहम्मद यांनी अवघ्या 14 व्या वर्षी आपले मामा सुप्रसिद्ध उर्दू शायर हुसेन अख्तर यांच्याकडून शायरीचे बाळकडू मिळाले. गनी मोहम्मद यांनी गेली सहा दशक श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. उत्कृष्ट शायरीने त्यांचे शेर आजही रसिक श्रोत्यांच्या स्मरणात आहे.


तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कवी संमेलनात त्यांना भाग घेण्याची संधी मिळाली होती. राज्य शासनाच्या पाटबंधारे विभागाचे ते सेवानिवृत्त कर्मचारी होते. गनी मोहम्मद यांनी विविध सामाजिक विषयांवर कविता केल्या. त्यांच्या पश्‍चात पत्नी, चार मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, जावई असा परिवार आहे. इंजिनीयर व उद्योजक अनिस शेख यांचे ते वडील होत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *