अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राहुरी येथील कै. शारदाताई गुलाबराव सपकाळ यांचे रविवारी (दि.30 ऑगस्ट) अल्पशः आजाराने निधन झाले. त्या 87 वर्षाच्या होत्या. त्यांचा अंत्यविधी गणपती घाट, राहुरी येथे करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. मनमिळावू स्वभाव व धार्मिक प्रवृत्तीच्या असल्याने ते सर्वांना सुपरिचित होत्या. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. भिंगार अहिल्यानगर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष व हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ यांच्या त्या चुलत्या होत्या.
शारदाताई सपकाळ यांचे निधन
शारदाताई सपकाळ यांचे निधन 