• Tue. Jun 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

गो सेवेसाठी शहरातून जुन्नरला धावल्या सेवाप्रीतच्या महिला

ByMirror

Oct 5, 2023

गो शाळेला महिनाभराचा चारा व तारेच्या संरक्षण कम्पाऊंडची मदत

अहमदनगर (प्रतिनिधी)- गो रक्षण करुन त्याचा सांभाळ करणाऱ्या व मदतीपासून दुर्लक्षीत राहिलेल्या जुन्नर (जि. पुणे) येथील शिव-पार्वती गो शाळेला शहरातील सेवाप्रीतच्या महिलांनी भेट देऊन एक महिन्याचा चारा दिला. तर गो शाळेला संरक्षक भिंत नसल्याने तारेचे संरक्षण कम्पाऊंड करुन देण्यात आले. या सामाजिक उपक्रमातून सेवाप्रीतच्या महिलांनी गो सेवेसाठी योगदान दिले.


या कार्यक्रमासाठी सेवाप्रीतच्या अध्यक्षा जागृती ओबेरॉय, प्रकल्प प्रमुख रितू वधवा, सुरेखा बारस्कर, मीरा बारस्कर, संगिता चव्हाण, कविता दरंदळे, मनीषा उल्हारे, वंदना गोसावी, शांता ठुबे, सुमन कपूर, शिल्पा सबलोक, राजश्री पोहेकर, वंदना ठुबे आदी उपस्थित होत्या.


जागृती ओबेरॉय म्हणाल्या की, आई आपल्या बाळाला दूध देऊन मोठे करते. त्याचप्रमाणे गाय ही दूध देत असते. गाय ही प्रत्येकासाठी माते समान आहे. भारतीय संस्कृतीत गायला मातेप्रमाणेच महत्त्व असून, प्रत्येकाने गो मातेची काळजी घेऊन गो सेवेत योगदान देण्याचे आवाहन त्यांनी केले.


रितू वधवा म्हणाल्या की, गो रक्षणातून मिळालेल्या गायांचा जुन्नर (जि. पुणे) येथील शिव-पार्वती गो शाळेत सांभाळ केला जातो. 35 पेक्षा अधिक गाय असलेल्या गो शाळा लोकवर्गणीतून चालते. मात्र गो शाळेला पुरेश्‍या प्रमाणात मदत उपलब्ध होत नसल्याने शहरातून सेवाप्रीतच्या महिलांनी धाव घेऊन जुन्नर गाठून त्यांना मदतीचा हात दिला. महिलांनी महिनाभर पुरेल इतका चारा गो शाळेला दिला आहे. तर भविष्यात वेळोवेळी सहकार्य करण्याचे त्यांनी महिलांच्या वतीने आश्‍वासन दिले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *