• Tue. Jun 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

डोनेट फर्स्टच्या फनोरंजनाने वंचित, दुर्बल, निराधार व मुकबधीर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

ByMirror

Oct 6, 2023

सांस्कृतिक कार्यक्रम व विविध मनोरंजनात्मक खेळात सहभागी होऊन केली धमाल

विद्यार्थ्यांना दैनंदिन उपयोगी साहित्य व बेडशीटची भेट

अहमदनगर (प्रतिनिधी)- महिलांचे संघटन करुन जैन समाजातील गरजू परिवारांना आधार देणाऱ्या डोनेट फर्स्टच्या महिलांनी वंचित, दुर्बल, निराधार व मुकबधीर विद्यार्थ्यांसाठी फनोरंजनचा आगळा वेगळा उपक्रम राबविला. बडीसाजन मंगल कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमात बालगोपालांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण करुन विविध मनोरंजनात्मक खेळातून धमाल केली.


या फनोरंजन उपक्रमात स्वामी विरजानंद गुरुकुल व जानकी बाई आपटे विद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. महिलांनी थाटलेल्या विविध खाद्य पदार्थांच्या स्टॉलला विद्यार्थ्यांनी भेट देऊन विविध खाद्यांचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाचे प्रारंभ गणेश वंदनेने झाले. या कार्यक्रमातील एरियल शो, मुलींचे मर्दानी खेळ, घूमर, टैलेंट शो, एक मिनट गेम व विविध खेळाचा विद्यार्थ्यांनी मनमुराद आनंद घेतला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून डोनेट फर्स्टने वंचित घटकातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले. यावेळी झालेल्या विविध स्पर्धेसह सोडत मधील विद्यार्थ्यांना आकर्षक भेट वस्तूंचे बक्षीस देण्यात आले.


या कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांसाठी ग्रुपच्या माध्यमातून दैनंदिन उपयोगी साहित्य व बेडशीटची भेट देण्यात आली. विद्यार्थ्यांच्या कार्यक्रमानंतर फनोरंजनाचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला करण्यात आला होता. या उपक्रमाला अबालवृध्दांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.


समाजातील गरजूंना मदत देण्यासाठी पाच मैत्रीणींपासून सुरु झालेल्या ग्रुपचे शहरातील मोठ्या संख्येने महिला सदस्या आहेत. सामाजिक बांधिलकी जपून ग्रुपच्या महिला योगदान देत आहे. वंचित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमास बडी साजन ओसवाल श्रीसंघ, विहार ग्रुप, महावीर ग्रुपचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ग्रुपच्या सर्व महिला सदस्यांनी परिश्रम घेतले.


By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *