• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

रयत शिक्षण संस्थेत उत्तर विभागाला विशेष प्रतिनिधीत्वाची संधी

ByMirror

May 14, 2026
नूतन पदाधिकाऱ्यांच्या कार्यकुशलतेमुळे संस्थेची प्रगती अधिक वेगाने होईल -सचिन झगडे

नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे उत्तर विभागीय कार्यालय व माध्यमिक शिक्षक संघाकडून स्वागत


नूतन पदाधिकाऱ्यांच्या कार्यकुशलतेमुळे संस्थेची प्रगती अधिक वेगाने होईल -सचिन झगडे

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- आशिया खंडातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी माजी केंद्रीय मंत्री मा. शरद पवार यांची पुन्हा एकदा निवड करण्यात आल्याचे व उत्तर विभागाच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे उत्तर विभागीय कार्यालय व माध्यमिक शिक्षक संघाकडून स्वागत करण्यात आले आहे. तर उत्तर विभागाला विशेष प्रतिनिधीत्वाची संधी मिळाली असल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.


शिक्षणाची गंगा बहुजनांच्या घराघरात पोहोचविणाऱ्या रयत शिक्षण संस्थेच्या संस्थेच्या उपाध्यक्षपदी अरूण पुंजाजी कडू-पाटील आणि सचिवपदी विकास विश्‍वासराव देशमुख यांची फेरनिवड करण्यात आली आहे. यासोबतच रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागातून मॅनेजिंग कौन्सिल सदस्य म्हणून ॲड. भगीरथ निवृत्ती शिंदे, श्रीमती मीनाताई माणिकराव जगधने, बाबासाहेब सहादू भोस, संदिप गोरखनाथ वर्पे, सुरेश विठ्ठलराव बोळीज, प्रिं. डॉ. नानासाहेब सूर्यभान गायकवाड, राजेंद्र खंडेराव चांदे यांची निवड झाली आहे.


या निवडीबद्दल उत्तर विभागाचे विभागीय अध्यक्ष आशुतोष काळे व विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनी नूतन कार्यकारिणीचे विशेष अभिनंदन केले आहे. ना. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नूतन पदाधिकाऱ्यांच्या कार्यकुशलतेमुळे संस्थेची शैक्षणिक, सामाजिक आणि संघटनात्मक प्रगती अधिक वेगाने होईल, अशी भावना अहिल्यानगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सचिन झगडे यांनी व्यक्त केली आहे.


उत्तर विभागातील सर्व जनरल बॉडी सदस्य, लाइफ वर्कर, लाइफ मेंबर, सर्व शिक्षक, मुख्याध्यापक आणि रयत हितचिंतकांनी या निवडीचे स्वागत करून नूतन पदाधिकाऱ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *