• Thu. May 14th, 2026

यस पी.ए. इनामदार स्कूलचा 10 वी बोर्डाचा 100 टक्के निकाल

ByMirror

May 14, 2026

92 टक्के घेऊन तहुरा शेख प्रथम; गुणवत्तेत मुलींची बाजी


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मुकुंदनगर येथील इकरा एज्युकेशन ॲण्ड वेलफेअर सोसायटी संचलित यस पी.ए. इनामदार इंग्लिश मिडीयम स्कूलचा इयत्ता दहावी (एसएससी) बोर्डाचा निकाल 100 टक्के लागला आहे. इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शैक्षणिक गुणवत्तेची परंपरा शाळेने कायम राखली आहे.


यावर्षीच्या दहावीच्या विद्यार्थ्यांनी उत्तम यश मिळवले. शाळेच्या गुणवत्ता यादीत तहुरा बशीर शेख 92.20 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला. माजीया साजिद कुरेशी हिने 91.80 टक्के घेऊन द्वितीय क्रमांक मिळवला, तर माहिन मोसीन पठाण हिने 90.60 टक्के गुण प्राप्त करत तृतीय क्रमांकावर स्थान मिळवले.


विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन अब्दुल रहिम खोकर, व्हाईस चेअरमन इंजि. इकबाल सय्यद, सचिव विकार काझी आणि खजिनदार डॉ. खालिद शेख, प्राचार्य युनूस सलीम, डारेक्टर शब्बीर मोहंमद सी. तसेच उपप्राचार्या फरहाना शेख यांनी गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले. तर विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
शाळेत वर्षभर मिळालेले शैक्षणिक मार्गदर्शन, नियमित सराव परीक्षा, अभ्यासातील सातत्य आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाल्याचे मत विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *