• Sun. Aug 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाच्या महिला जिल्हाध्यक्षपदी लतिका पवार यांची फेरनियुक्ती

ByMirror

Jun 4, 2026
वृक्षसंवर्धन, जनजागृती आणि सामाजिक कार्याची दखल

वृक्षसंवर्धन, जनजागृती आणि सामाजिक कार्याची दखल


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संरक्षण, वृक्षसंवर्धन आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या लतिका नंदकुमार पवार यांची निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ (महाराष्ट्र राज्य) यांच्या महिला जिल्हाध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे राज्याध्यक्ष प्रमोद मोरे यांनी त्यांच्या पर्यावरण विषयक जनजागृती, वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन क्षेत्रातील सातत्यपूर्ण योगदानाची दखल घेत ही नियुक्ती जाहीर केली.


सन 2023 ते 2025 या कालावधीत त्यांनी केलेल्या प्रभावी कार्याचा गौरव म्हणून त्यांच्यावर पुन्हा विश्‍वास व्यक्त करण्यात आला आहे. त्यांचा नवीन कार्यकाळ 2026 ते 2029 या तीन वर्षांसाठी असणार असून, या काळात पर्यावरण संवर्धनासाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, जनजागृती मोहिमा आणि सामाजिक सहभाग वाढविणाऱ्या योजना राबविण्याचा त्यांचा मानस आहे. लतिका पवार यांनी पर्यावरण संरक्षणासाठी केवळ वृक्षारोपण करून चालणार नाही, तर लावलेली झाडे जगविणे आणि त्यांचे संवर्धन करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगितले. आगामी काळात शालेय विद्यार्थी, महिला बचत गट, सामाजिक संस्था आणि नागरिकांच्या सहभागातून व्यापक वृक्षसंवर्धन मोहीम उभारली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर प्लास्टिकमुक्ती, जलसंवर्धन, जैवविविधता संरक्षण, स्वच्छता अभियान आणि पर्यावरणपूरक जीवनशैली याबाबत जनजागृती करण्यावरही भर दिला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


लतिका पवार या पर्यावरण क्षेत्रासोबतच सामाजिक क्षेत्रातही सक्रियपणे कार्यरत आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामाजिक संस्था ऑल इंडिया लिनेस क्लबमध्ये त्यांनी प्रेसिडेंट ते डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंटपर्यंत विविध महत्त्वपूर्ण पदांची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक समाजोपयोगी, महिला सक्षमीकरण आणि सामाजिक बांधिलकी जपणारे उपक्रम राबविण्यात आले. याशिवाय मागील 20 वर्षांपासून त्या मराठा समाजामध्ये विनामूल्य विवाह जुळविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य करत आहेत. कोणतेही शुल्क न आकारता समाजातील अनेक कुटुंबांना एकत्र आणण्याचे कार्य त्यांनी सातत्याने केले असून त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाला समाजातून मोठा प्रतिसाद मिळत आहे.


लतिका पवार यांच्या नियुक्तीबद्दल माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्षा रेश्‍मा आठरे, वैशाली गुंड, सुनंदा कांबळे, रेणुका मिसाळ, किरण कटारिया, शालिनी राठोड, ऑल इंडिया लिनेस क्लबच्या प्रेसिडेंट हिंदूजी मेहता, कुमकुम वर्मा, अंजलीताई विसपुते, अलकाताई डोंगरे, डॉ. वर्षाताई झंवर, डॉ. सीमाजी पाटणी, उषाजी डड्डी, आनंद कदम, संतोष कदम, प्रसाद पवार, योगिनी पवार (पुणे), विजया पवार, धार पवार ग्रुपचे अध्यक्ष सागरदादा पवार, किरण बारस्कर, अलिशा गरजे, शारदा जगदाळे, आरती लोखंडे, सारिका खताडे, वैष्णवी लोंढे, रश्‍मी घोगरे, संजय कदम, सरकारी वकील ॲड. सुरेश लगड, स्वाती कदम, डॉ. सोनाली मोटे आणि डॉ. स्वामिनी बच्छाव यांच्यासह विविध सामाजिक, राजकीय व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *