• Sat. Oct 3rd, 2026

Mirrornews24

Marathi News

राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हा महासचिवपदी प्रा. युनुस शेख यांची नियुक्ती

ByMirror

Oct 3, 2026
शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल

खासदार निलेश लंके यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार


शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या अहिल्यानगर जिल्हा महासचिवपदी प्रा. युनुस शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार निलेश लंके यांच्या हस्ते शेख यांना नियुक्तीचे पत्र प्रदान करण्यात आले. पक्षाचे जिल्हाध्यक्ष अथर खान यांनी नुकतीच त्यांच्या निवडीची घोषणा केली.
प्रा. युनुस शेख यांच्यावर पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाची महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली असून, जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासोबतच अल्पसंख्याक समाजातील विविध प्रश्‍न मांडण्यासाठी ते कार्यरत राहणार आहेत. नियुक्तीपत्र प्रदान करताना जिल्हा कार्याध्यक्ष समीर पठाण, शहर जिल्हाध्यक्ष अजहर शेख, तारिक कुरेशी, फरहान शेख, फारूक रंगरेज आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


यावेळी प्रा. युनुस शेख यांनी पक्षाने सोपविलेली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडण्याचा निर्धार व्यक्त केला. पक्षवाढीसाठी जिल्हाभरात सक्रियपणे काम करून अल्पसंख्याक समाजातील शैक्षणिक, सामाजिक व इतर प्रश्‍नांना पक्षाच्या माध्यमातून वाचा फोडण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे त्यांनी सांगितले. सत्ताधारी पक्षाच्या धोरणांमुळे अल्पसंख्याक समाजासमोरील काही प्रश्‍न अधिक बिकट बनले असून, या प्रश्‍नांवर आवाज उठविण्याचे काम केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


प्रा. युनुस शेख हे शैक्षणिक चळवळीशी दीर्घकाळ जोडलेले असून, नुकतेच अहमदनगर जिल्हा उर्दू मुख्याध्यापक असोसिएशनच्या माध्यमातून अँग्लो उर्दू हायस्कूल, जामखेड येथील मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. शिक्षण क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्‍नांसाठी तसेच अल्पसंख्याक शाळांच्या अडचणी सोडविण्यासाठी पाठपुरावा केला आहे.


शैक्षणिक क्षेत्रातील कार्यासोबतच त्यांचा जिल्हाभरात व्यापक जनसंपर्क आहे. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक विद्यार्थी घडले असून, सामाजिक क्षेत्रातही त्यांनी विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. शैक्षणिक, सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेत पक्षाने त्यांच्यावर अल्पसंख्याक विभागाच्या जिल्हा महासचिवपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या नियुक्तीबद्दल आमदार रोहित पवार, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, जिल्हाध्यक्ष प्रा. सीताराम काकडे, प्रदेश उपाध्यक्ष हाजी शौकत तांबोळी आदींसह पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *