• Wed. Sep 23rd, 2026

Mirrornews24

Marathi News

मराठी राजभाषा कृती समितीच्या जिल्हा सचिवपदी वृषाली कुलकर्णी !

ByMirror

Sep 23, 2026
राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर कृती समित्यांची प्रभावी बांधणी सुरु

राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर कृती समित्यांची प्रभावी बांधणी सुरु


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- श्री समर्थ विद्यामंदिर (प्राथमिक विभाग), सावेडी येथील ज्येष्ठ शिक्षिका सौ. वृषाली प्रसाद कुलकर्णी यांची मराठी राजभाषा कृती समितीच्या अहिल्यानगर जिल्हा सचिवपदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
मराठी भाषेचा प्रचार-प्रसार व संवर्धन अधिक व्यापक स्वरूपात व्हावे, मराठीला ज्ञानभाषेचा सन्मान मिळावा, मराठी माध्यमाच्या शाळांना बळकटी मिळावी आणि विद्यार्थी, शिक्षक, पालक व समाजामध्ये मराठी भाषेविषयी अभिमान व आत्मीयता निर्माण व्हावी, या उद्देशाने मराठी राजभाषा कृती समितीच्या राज्य, जिल्हा व तालुकास्तरीय निवडीची प्रक्रिया सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून सौ. वृषाली प्रसाद कुलकर्णी यांची जिल्हा सचिवपदी निवड करण्यात आली.
यावेळी मराठी राजभाषा संवर्धन प्रतिष्ठानचे संस्थापक अमोल क्षीरसागर यांच्या हस्ते सौ. कुलकर्णी यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सुलोचना अमोल क्षीरसागर यांच्या उपस्थितीत त्यांच्या निवडीचा सर्वानुमते ठराव संमत करण्यात आला.


मराठी राजभाषा संवर्धन प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्रभर मराठी भाषेच्या जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. राज्यस्तरीय मराठी प्राविण्य परीक्षा, मराठी भाषा जनजागृती अभियान, शैक्षणिक व साहित्यिक उपक्रम, व्याख्याने, शिक्षक-विद्यार्थी प्रबोधन आणि मराठी माध्यमाच्या शाळांना प्रोत्साहन देत मराठी भाषेच्या संवर्धनाची चळवळ अधिक व्यापक करण्याचा प्रयत्न सुरू आहे.


जिल्हा सचिव म्हणून वृषाली कुलकर्णी यांच्या माध्यमातून अहिल्यानगर जिल्ह्यातील शाळा, शिक्षक, विद्यार्थी, पालक, साहित्यिक व सामाजिक संस्थांना मराठी राजभाषा संवर्धनाच्या कार्याशी जोडून ‘मराठी बोलू, मराठी शिकू, मराठी जगू आणि मराठी जपू’ या भावनेला बळ देण्याचे कार्य अपेक्षित आहे. मराठी भाषेच्या संवर्धनाच्या चळवळीला कुलकर्णी यांच्या शैक्षणिक अनुभवाचा व कार्यतत्परतेचा निश्‍चितच लाभ होईल, असा विश्‍वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.
यावेळी श्री समर्थ प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका धनश्री गुंफेकर तसेच विद्यालयातील सहशिक्षिका उपस्थित होत्या. वृषाली कुलकर्णी यांच्या निवडीबद्दल मुख्याध्यापिका, विद्यालयातील सहशिक्षिका गीतांजली शेरकरव अश्‍विनी जाधव उपस्थित होत्या तसेच इतर शिक्षक-शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी तसेच संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *