• Wed. Oct 28th, 2026

Mirrornews24

Marathi News

भाजपा वाहतूक सेलच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब शिंदे यांची नियुक्ती

ByMirror

Oct 28, 2026
पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडून सत्कार

पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडून सत्कार


वाहतूकदारांच्या हिताला प्राधान्य देत त्यांच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी योगदान देणार -शिंदे


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भाजपा प्रणित नवभारतीय शिववाहतूक संघटना/ भाजपा वाहतूक सेलच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी बाबासाहेब बाबुराव शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष हाजी अराफात शेख यांनी त्यांच्या नियुक्तीची घोषणा केली.


बाबासाहेब शिंदे यांच्या निवडीबद्दल अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांचा सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. पालकमंत्री विखे यांनी वाहतूकदारांच्या हिताचे रक्षण करणे, त्यांच्या समस्या समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणे आणि त्यांच्या न्याय्य मागण्यांना शासना पर्यंत पोहचवून ते प्रश्‍न सोडविण्यासाठी पुढाकार घेण्याचे सांगितले.


सत्काराला उत्तर देताना नवनियुक्त जिल्हाध्यक्ष बाबासाहेब बाबुराव शिंदे यांनी वाहतूकदारांच्या न्याय्य हक्कांसाठी सदैव तत्पर राहून काम करण्याची ग्वाही दिली. संघटनेने आपल्यावर दाखविलेला विश्‍वास सार्थ ठरविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून, वाहतूकदारांच्या हिताला प्राधान्य देत त्यांच्या प्रश्‍नांच्या सोडवणुकीसाठी योगदान देणार आहे. जिल्ह्यातील वाहतूक क्षेत्रात कार्यरत असलेल्या व्यावसायिकांच्या प्रश्‍नांना संघटनेच्या माध्यमातून प्रभावीपणे सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या नियुक्तीबद्दल भाजपाच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांनी बाबासाहेब शिंदे यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *