• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरातील संत गोरा कुंभार सोसायटीत रस्ता मजबुतीकरण, डांबरीकरण कामाचा शुभारंभ

ByMirror

Mar 16, 2024

राज्यात सत्ता असल्याने शहरातील अनेक विकासकामे मार्गी -पै. महेश लोंढे

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर-कल्याण रोड येथील संत गोरा कुंभार सोसायटी येथील रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरण व काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. या परिसरात खराब झालेले रस्ते डांबरीकरण व काँक्रिटीकरणाने चकाकणार आहे.


मनपाहद्दीतील मूलभूत सुविधांच्या विकासासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आला आहे. या रस्त्याच्या भूमीपूजनप्रसंगी युवासेनेचे शहर प्रमुख पै. महेश लोंढे, भाजपचे जिल्हाध्यक्ष ॲड. अभय आगरकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य विवेक नाईक, भाजपच्या सरचिटणीस सविता कोटा, भाजप युवा मोर्चाचे ओमकार लेंडकर, महिला मोर्चाच्या सरचिटणीस ज्योती दांडगे, सिध्देश झावरे, विवेक सोनवणे, महेश दिवेकर, अक्षय चुकाटे, अनुज निषाद आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पै. महेश लोंढे म्हणाले की, राज्यात भाजप व शिवसेनेची सत्ता असल्याने शहरातील अनेक विकासकामे मार्गी लागत आहे. मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्याने विकासाला चालना मिळाली आहे. नगर-कल्याण भागात मोठ्या प्रमाणात नागरी समस्या होत्या. ते सोडविण्यासाठी सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न करुन अनेक कामे मार्गी लावल्याचे त्यांनी सांगितले.


सविता कोटा यांनी नागरिकांना सोयी-सुविधा देण्याचा विकासात्मक दृष्टीकोन समोर ठेऊन विकास कामे सुरु आहेत. शहरालगत असलेले नगर-कल्याण रोड येथे झपाट्याने लोकवस्ती वाढली असून, येथील नागरिकांना मुलभूत सुविधा निर्माण करुन दिल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या भागात पावसाळ्यात महिला, विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. नवीन रस्त्यामुळे मोठा दिलासा मिळणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *