• Fri. Jun 19th, 2026

Mirrornews24

Marathi News

बारा इमाम कोठला मध्ये काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ

ByMirror

Mar 16, 2024

खासदार विखे यांच्या निधीतून जाधव यांच्या पाठपुराव्याने अनेक वर्षापासूनचा प्रलंबीत प्रश्‍न मार्गी

सर्व धर्मिय भाविकांच्या आस्थेचा विषय असल्याने या कामात कोणीही राजकारण करु नये -सचिन जाधव

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील बारा इमाम कोठला मधील परिसराच्या काँक्रिटीकरण कामाचा शुभारंभ मौलाना तज्जमुल हुसैन यांच्या हस्ते झाला. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विकास निधीतून माजी नगरसेवक सचिन जाधव यांच्या पाठपुराव्याने सदर काम मार्गी लावण्यात आले. तर जाधव यांनी कोठला भागातील समस्यांची पहाणी करुन नागरिकांशी संवाद साधून प्रश्‍न सोडविण्याचे आश्‍वासन त्यांनी दिले.


या उद्घाटनाप्रसंगी नगरसेवक अनिल शिंदे, सचिन जाधव, दस्तगीर जहागीरदार, निसार जहागीरदार, इलियास सय्यद पिरजादे, आवेज सय्यद, इलियास जहागीरदार, परवेज सय्यद, जहागीरदार, इम्रान खान, इलियास बेग, रिजवान बेग, इरफान शेख, इकबाल शेख, उबेद जहागीरदार, मोहसीन शेख आदी उपस्थित होते.


सचिन जाधव म्हणाले की, बारा इमाम कोठला येथे मोहरममध्ये मोठ्या संख्येने सर्व धर्मिय भाविक दर्शनास येतात. तर या भागात मोठी लोकवस्ती असून, या परिसराचा रस्ता खराब असल्याने नागरिकांसह भाविकांची गैरसोय होत होती. मोहरममध्ये तात्पुरते पॅचिंग करुन वेळकाढूपणा करण्यात येत होता. पावसाळ्यात नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. मात्र नागरिकांचा रस्त्याचा प्रश्‍न कायमचा सोडविण्यासाठी काँक्रिटीकरण कामाला प्रारंभ करण्यात आले आहे.

या भागातील कामाची गरज ओळखून 20 लाख रुपयाचे काँक्रिटीकरणाचे काम सुरु करण्यात आले आहे. भविष्यात 1 कोटीचे काम होणार असून, विकास कामाचा हा पहिला टप्पा आहे. स्थानिक नागरिक व भाविकांचा आस्थेचा विषय असल्याने या कामात कोणीही राजकारण करु नये, सर्वांबरोबर घेऊन कामाचे नियोजन केले जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *