• Sun. Aug 30th, 2026

Mirrornews24

Marathi News

वर्षानुवर्षे रखडलेल्या वंजार गल्लीतील रस्त्याला अखेर मुहूर्त

ByMirror

Aug 30, 2026
नगरसेवक सागर मुर्तडकर यांच्या प्रयत्नातून काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात

नगरसेवक सागर मुर्तडकर यांच्या प्रयत्नातून काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात


प्रभाग क्रमांक 10 मध्ये विकासकामांना गती; ‘प्रलंबित प्रश्‍न टप्प्याटप्प्याने मार्गी लावणार -उपमहापौर ॲड. धनंजय जाधव


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- शहरातील प्रभाग क्रमांक 10 मधील वंजार गल्ली परिसरातील वर्षानुवर्षे रखडलेल्या रस्त्याच्या प्रश्‍नाला अखेर गती मिळाली आहे. नागरिकांच्या दैनंदिन अडचणींचा विचार करून नगरसेवक सागर मुर्तडकर यांच्या प्रयत्नातून या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन करण्यात आले. रस्त्याचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
वंजार गल्ली परिसरातील रस्त्याची अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली होती. रस्त्याच्या समस्येमुळे नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. विशेषतः पावसाळ्यात रस्त्याची अवस्था अधिक बिकट होत असल्याने नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या पार्श्‍वभूमीवर रस्त्याचे काँक्रिटीकरण व्हावे, अशी नागरिकांची मागणी होती. नगरसेवक सागर मुर्तडकर यांनी या प्रश्‍नाचा पाठपुरावा करून अखेर रस्त्याच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली.


या कामाच्या उद्घाटन सोहळ्यास उपमहापौर धनंजय जाधव, नगरसेवक सागर मुर्तडकर, नगरसेविका मयुरीताई जाधव, नगरसेविका शीतलताई ढोणे, संजय ढोणे, भाजप नेते बाबासाहेब सानप, सूरज जाधव, कुस्ती संघटनेचे वैभव लांडगे, श्रीकांत फंड, निलेश खांडरे, शुभम गंगेकर, सचिन दिवटे, ज्ञानेश्‍वर ढापसे, जगन्नाथ शेट बजाज, बिहानी शेठ, भाजपचे ज्येष्ठ नेते अनिल गट्टानी, गणेश शेठ कांबळे, शरद मुर्तडकर, विनाताई ढापसे, उमेश काळे, गणेश भाऊ भिंगारदिवे, हरिभाऊ जुम्मेवाले यांच्यासह प्रभागातील अनेक मान्यवर, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.


उपमहापौर धनंजय जाधव म्हणाले की, प्रभाग क्रमांक 10 मध्ये भाजपचे तीन नगरसेवक बहुमताने निवडून आल्यानंतर परिसरातील विकासकामांना वेग आला आहे. वंजार गल्लीसह प्रभागातील अनेक भागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विविध विकासकामे प्रलंबित होती. मात्र, सागर मुर्तडकर नगरसेवक झाल्यानंतर नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत.


अनेक वर्षांपासून विकासापासून वंचित असलेल्या भागाला आता सागर मुर्तडकर यांच्या माध्यमातून विकासाची गती मिळत आहे. प्रभागातील प्रलंबित प्रश्‍न टप्प्याटप्प्याने मार्गी लावले जातील, असा विश्‍वास धनंजय जाधव यांनी व्यक्त केला. वंजार गल्लीतील रस्त्याच्या काँक्रिटीकरणामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. रस्ता सुस्थितीत झाल्यानंतर नागरिकांची दैनंदिन वाहतूक अधिक सुलभ होणार असून, ये-जा करताना होणाऱ्या अडचणी कमी होतील. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित प्रश्‍न सोडविण्याच्या दृष्टीने हे महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी सांगितले.


नगरसेवक सागर मुर्तडकर यांच्या प्रयत्नातून रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि प्रभागातील प्रलंबित विकासकामांना प्राधान्य देऊन कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
प्रभाग क्रमांक 10 मधील विविध भागांमध्ये रस्ते, पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्‍न सोडविण्याची गरज असून, उपलब्ध निधी व प्रशासकीय प्रक्रियेनुसार विकासकामांना गती देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वंजार गल्लीतील रस्त्याचे काँक्रिटीकरण हे त्याचाच एक भाग मानला जात आहे. रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, रखडलेल्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाल्याबद्दल नागरिकांनी नगरसेवक सागर मुर्तडकर यांचे आभार व्यक्त केले. कार्यक्रमास भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *