• Wed. Jun 17th, 2026

Mirrornews24

Marathi News

जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह साजरा

ByMirror

Oct 13, 2023

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन, परिचर्या महाविद्यालयाचा उपक्रम

मनोरुग्णांची मानसिक तपासणी करुन तणावमुक्त जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश

अहमदनगर (प्रतिनिधी)- डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन, परिचर्या महाविद्यालय (विळदघाट) च्या वतीने जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला. मनोरुग्णांची मानसिक तपासणी करुन तणावमुक्त जीवनशैली अंगीकारण्याचा संदेश देण्यात आला. तर मानसिक आरोग्य हा जागतिक मानवाधिकार या थीमवर विविध उपक्रम राबविण्यात आले.


दरवर्षी महाविद्यालयाच्या माध्यमातून जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह साजरा करण्या येतो. यावर्षी परिचर्या महाविद्यालय व स्नेहालय संचालित स्नेह मनोयात्री पुनर्वसन केंद्र, इसळक यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक आरोग्य परिचर्या विभाग व मानसिक आरोग्य परिचर्या विभागाच्या समन्वयाने स्नेह मनोयात्री पुनर्वसन केंद्रातील सर्व मनोरुग्णांची मानसिक तपासणी करण्यात आली. तृतीय वर्षच्या विद्यार्थ्यांनी वैयक्तिक स्वच्छतेविषयी मनोरंजनात्मक नाटिका सादर केल्या. उपस्थितांना तणावमुक्त जीवनशैली बद्दल माहिती दिली.


यावेळी स्नेह मनोयात्री पुनर्वसन केंद्राचे प्रकल्प समन्वयक रमाकांत दोड्डी आणि सहकर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्या डॉ. प्रतिभा चांदेकर, उपप्राचार्य व सामाजिक आरोग्य परिचर्या विभागप्रमुख डॉ. योगिता औताडे, मानसिक आरोग्य परिचर्या विभागप्रमुख अमित कडू ह्यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिचर्या महाविद्यालयाचे शिक्षक नितीन निर्मळ व प्रशांत अंबरीत यांनी परिश्रम घेतले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *