हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या सदस्यांचा उपक्रम
आजच्या पिढीने पर्यावरणाचे रक्षण केल्यास, पर्यावरण त्यांच्या भावी पिढ्या सुरक्षित करेल -संजय सपकाळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वाढदिवस साजरा करण्याची एक प्रेरणादायी उपक्रम हरदिन मॉर्निंग ग्रुपचे सदस्य सातत्याने राबवित आहेत. ग्रुपचे सदस्य सर्वेश सपकाळ यांनी आपला मुलगा र्इवानचा वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा केला. “एक वाढदिवस एक वृक्ष” हा संदेश समाजात पोहोचत असून, लावलेल्या झाडाच्या संवर्धनाची जबाबदारी देखील घेतली जात आहे.
भिंगार येथील भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्कमध्ये र्इवान सपकाळ यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातंर्गत अनेक सदस्यांनी लावलेल्या झाडांमुळे परिसर हिरवार्इने बहरले आहे. वृक्षारोपणानंतर रोकडेश्वर मंदिर येथे गरजू नागरिकांना मिष्टान्न भोजनाचे वाटप करून सामाजिक बांधिलकीही जपण्यात आली.
या प्रसंगी उद्योजक कमलेश झंवर, डॉ. दमन काशीद, सचिन परदेशी, हरदिनचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन चोपडा, अशोक दुसुंगे, अभिजीत सपकाळ, अशोक पराते, सतीश सपकाळ, जहीर सय्यद, मुन्ना वाघस्कर, दीपक धाडगे, मनोहर दरवडे, संपत बेरड, जैद सय्यद, नवनाथ वेताळ, शामराव वाघस्कर, रमेश भिंगारदिवे, ओम साळवे, प्रशांत भिंगारदिवे, जीआन सय्यद, शैलेश यादव तसेच प्रांजली सपकाळ, शिल्पाताई दुसुंगे, संगीता सपकाळ, तृप्ती यादव, आर्या यादव, श्रीशा यादव, शुभ्रा कनोजिया, शिल्पाताई झंवर, माधवी माळगे, भाग्यश्री सपकाळ, महिमा माळगे आदी मान्यवर उपस्थित होते.
संजय सपकाळ म्हणाले की, आजच्या काळात पर्यावरणाचे संतुलन राखणे ही अत्यंत गरजेची बाब आहे. आजच्या पिढीने पर्यावरणाचे रक्षण केल्यास, पर्यावरण त्यांच्या भावी पिढ्या सुरक्षित करेल. वाढदिवसासारख्या आनंदाच्या क्षणी जर आपण एक झाड लावले, तर तो आनंद समाजासाठीही उपयुक्त ठरतो. हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या माध्यमातून आम्ही केवळ वृक्षारोपणच करत नाही, तर त्या झाडांचे संगोपन करण्याची जबाबदारीही स्वीकारतो. भविष्यात अधिकाधिक लोकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, हीच अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.
कमलेश झंवर म्हणाले की, आजचा हा उपक्रम केवळ वाढदिवस साजरा करण्यापुरता मर्यादित नाही, तर तो समाजाला दिशा देणारा आहे. पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. अशा उपक्रमांमुळे लहान मुलांमध्येही निसर्गाबद्दल प्रेम आणि जाणीव निर्माण होते. सपकाळ परिवाराची तिसरी पिढी देखील पर्याारण व आरोग्य चळवळीशी जोडली गेली आहे. र्इवानसारख्या लहान मुलाच्या हस्ते वृक्षारोपण होणे ही अत्यंत कौतुकास्पद बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
