हरदिन मॉर्निंग ग्रुपतर्फे भानुदास कोतकर यांच्या आठवणींना उजाळा
ज्येष्ठ नेते कोतकर यांच्या सामाजिक कार्याचा वारसा सदैव स्मरणात राहील -संजय सपकाळ
अहिल्यानगर (प्रतिनिधी)- भिंगार येथील ज्येष्ठ नेते स्व. भानुदास कोतकर यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी, त्यांच्या कार्याच्या आणि आठवणींच्या माध्यमातून कायम जाणवत राहील, अशा भावना व्यक्त करत हरदिन मॉर्निंग ग्रुपच्या वतीने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. भगवान गौतम बुद्ध जॉगिंग पार्क येथे आयोजित श्रद्धांजली सभेत उपस्थितांनी स्व. कोतकर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या सामाजिक आणि राजकीय कार्याचे स्मरण केले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील जिव्हाळा, लोकांशी असलेले संबंध आणि समाजजीवनातील योगदान यांचा उल्लेख करत उपस्थितांनी आदरांजली वाहिली.
प्रारंभी स्व. भानुदास कोतकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी या श्रद्धांजली सभेस हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ, सचिन चोपडा, दिलीप ठोकळ, श्यामराव वागस्कर, महेश नामदे, दीपक धाडगे, सर्वेश सपकाळ, जहीर सय्यद, ताराचंद ठोकळ, अशोक पराते, सुधीर कपाळे, सखाराम अळकुटे, योगेश चौधरी, अभिजीत सपकाळ, सुंदर पाटील, सरदारसिंग परदेशी, निजाम पठाण, ईशान शेख, मनोहर दरवडे, शेषराव पालवे, अविनाश पोतदार, दीपकराव घोडके, दशरथ मुंडे, उमाशंकरसिंग पंडित, जोगिंदरसिंग, भूषण लंगोटे, संदीप छजलानी, प्रवीण मुसळे, संजय भिंगारदिवे, विशाल भामरे, निलेश साठे आदी उपस्थित होते.
यावेळी उपस्थितांनी स्व. भानुदास कोतकर यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
ज्येष्ठ व्यक्तींचे समाजातील स्थान केवळ त्यांच्या पदामुळे किंवा राजकीय कारकिर्दीमुळे ठरत नसते, तर त्यांनी लोकांशी निर्माण केलेल्या आपुलकीच्या नात्यांमुळे आणि समाजमनावर उमटविलेल्या ठशांमुळे ते कायम स्मरणात राहतात, अशी भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली.
हरदिन मॉर्निंग ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ म्हणाले की, स्व. भानुदास कोतकर यांच्यासारख्या ज्येष्ठ व्यक्तींचे योगदान समाजासाठी नेहमीच प्रेरणादायी असते. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांनी समाजजीवनात निर्माण केलेली ओळख आणि लोकांशी जोडलेली नाती यांचे महत्त्व अधोरेखित होते. त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा सदैव स्मरणात राहील.
एखादी व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यानंतरही तिच्या आठवणी, विचार आणि कार्य समाजाच्या स्मरणात जिवंत राहतात. स्व. कोतकर यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे, ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाविषयी असलेल्या आदराची आणि आपुलकीची भावना व्यक्त करणारी बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.
सचिन चोपडा यांनी आपल्या मनोगतात स्व. भानुदास कोतकर यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. माणसाचे आयुष्य मर्यादित असले, तरी त्याने निर्माण केलेली नाती, लोकांच्या मनात मिळविलेले स्थान आणि त्याच्याशी जोडलेल्या आठवणी दीर्घकाळ टिकून राहतात.
ज्येष्ठ व्यक्तींच्या सहवासातून मिळणारे अनुभव आणि मार्गदर्शन पुढील वाटचालीसाठी महत्त्वाचे ठरते. त्यामुळे त्यांच्या स्मृती जपणे आणि त्यांच्या कार्याचा आदर करणे आवश्यक आहे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. राजकारणात त्यांनी सामाजिक बांधिलकी जपाल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी श्यामराव वागस्कर आणि महेश नामदे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. त्यांनी स्व. भानुदास कोतकर यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

