• Tue. Oct 27th, 2026

Mirrornews24

Marathi News

भैय्या बॉक्सर यांना ‘विश्व शांतीदूत’ पुरस्कार प्रदान!

ByMirror

Oct 27, 2026
कोरोना काळातील सामाजिक कार्याची दखल

कोरोना काळातील सामाजिक कार्याची दखल


अहिल्यानगर (प्रतिनिधी)- सामाजिक बांधिलकी जपत गरजवंतांना मदतीचा हात देणारे सामाजिक कार्यकर्ते भैय्या बॉक्सर यांना ‘विश्व शांतीदूत पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. फ्रीडम फाउंडेशनच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित पुरस्कार सोहळ्यात त्यांच्या सामाजिक कार्याची दखल घेण्यात आली. हेल्पिंग हॅन्ड्स युथ फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा सन्मान करण्यात आला.
फ्रीडम फाउंडेशन आणि ग्लोरिअस ग्लोबल सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने, फ्रीडम फाउंडेशनचे संस्थापक बिशप डॉ. प्रदीप वाघमारे यांच्या पुढाकाराने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. समाजात शांतता, बंधुभाव, मानवता आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ११ व्यक्तींना ‘विश्व शांतीदूत पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.


पुरस्कार सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बिशप प्रा. डॉ. अनिश विजागत आणि प्रा. ज्युलिया विजागत उपस्थित होते. फ्रीडम फाउंडेशनचे संस्थापक बिशप डॉ. प्रदीप वाघमारे आणि विश्वस्त बिशप डॉ. साधना कदम यांच्या हस्ते पुरस्कारार्थींना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे व सहकारी म्हणून जॉन्सन पॉलूस, राजेंद्र कदम, प्राजक्ता राठोड, डॉ. रुपाली साळवी आणि एलिझाबेथ लोंढे यांची विशेष उपस्थिती होती.
कोरोना महामारीच्या कठीण काळात अनेकांना अन्नधान्य आणि दैनंदिन गरजांच्या वस्तू मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागत होता. अशा परिस्थितीत भैय्या बॉक्सर यांनी पुढाकार घेत अनेक बेवारस आणि गरजू व्यक्तींना मदतीचा हात दिला. त्यांनी गरजूंना मोफत जेवणाची व्यवस्था केली, तसेच अनेक कुटुंबांच्या घरी स्वखर्चातून किराणा माल आणि अन्नधान्य पोहोचवून माणुसकीचे दर्शन घडविले.


संकटाच्या काळात समाजातील वंचित आणि गरजू घटकांच्या मदतीसाठी त्यांनी केलेले कार्य विशेष उल्लेखनीय ठरले.
शिक्षणापासून कोणताही विद्यार्थी वंचित राहू नये, या भावनेतून भैय्या बॉक्सर यांनी झोपडपट्टी भागातील शाळकरी मुलांना वेळोवेळी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून दिले. आर्थिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी त्यांनी मदतीचा हात पुढे केला. शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातील विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजातील गरजू घटकांपर्यंत मदत पोहोचविण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे.


याशिवाय, सांस्कृतिक क्षेत्रातील कलाकारांच्या विविध प्रश्नांसाठीही ते सक्रियपणे काम करतात. कलाकारांना भेडसावणाऱ्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी संबंधितांकडे पाठपुरावा करणे, त्यांच्या समस्या मांडणे आणि त्यांना आवश्यक सहकार्य मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे, अशा माध्यमांतून त्यांनी कलाकारांप्रती असलेली बांधिलकी जपली आहे. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *