• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

राष्ट्रवादी युवकने केले काळे झेंडे दाखवून जयंत पाटील यांच्या निलंबनाचा निषेध

ByMirror

Dec 23, 2022

विरोधी पक्षाचा आवाज दाबणे हुकूमशाहीचे लक्षण -इंजि. केतन क्षीरसागर

अहमदनगर (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहरात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि पक्षाचे विधिमंडळातील नेते जयंत पाटील यांच्यावर विधानसभा सभागृहात झालेल्या निलंबनाच्या कारवाईचा निषेध नोंदविण्यात आला. जुने बसस्थानक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर राज्य सरकारला काळे झेंडे दाखवून ईडी व खोके सरकार निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या.


या आंदोलनात राष्ट्रवादी युवकचे शहर जिल्हाध्यक्ष इंजि. केतन क्षीरसागर, गजेंद्र भांडवलकर, ललित क्षीरसागर, सुमित कुलकर्णी, ओमकार म्हसे, संदीप गवळी, दीपक वाघ, चेतन क्षीरसागर, किरण घुले, अभिजीत खरात, आशुतोष पानमलकर, अभिजीत सपकाळ, चैतन्य पछाडे, गौरव हरबा, शिवम कराळे, विनीत गाडे, निहाल जाधव, पंकज शेंडगे, शेटे आदींसह राष्ट्रवादी युवकचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


इंजि. केतन क्षीरसागर म्हणाले की, केंद्राप्रमाणे राज्य सरकार विरोधी पक्ष संपविण्याच्या तयारीत आहे. विरोधी पक्षांना बोलण्याचा अधिकार हिरावून त्यांचा आवाज दाबला जात आहे. हुकूमशाही पध्दतीने सरकारचे काम सुरु असून, महापुरुषांवर अवमानकारक वक्तव्य करणार्‍यांना सूट तर जनतेचे प्रश्‍न मांडण्यासाठी सभागृहात बोलू न देता थेट कारवाईचा बडगा उगारला जात आहे. सातत्याने विरोधी पक्षाचा आवाज दाबणे लोकशाहीला घातक असून, हे हुकूमशाहीचे लक्षण असल्याचे त्यांनी सांगितले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *