• Wed. Aug 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

फुले ब्रिगेडच्या वतीने चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध

ByMirror

Dec 10, 2022

चंपावाणी निषेधच्या घोषणा

महापुरुषांच्या संघर्षातून चुकीचे विधान करणार्‍याला मंत्र्याला शिक्षणाची भीक मिळाली – दिपक खेडकर

अहमदनगर (प्रतिनिधी)- फुले ब्रिगेडच्या वतीने भाजपचे नेते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध नोंदविण्यात आला. माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ जोरदार निदर्शने करुन चंपावाणी निषेधच्या घोषणा देण्यात आल्या.


महात्मा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आंदोलनाची सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात फुले ब्रिगेडचे शहर अध्यक्ष दिपक खेडकर, महिला जिल्हाध्यक्ष रेणूकाताई पुंड, फुले ब्रिगेड सावेडी शहर अध्यक्ष किरण जावळे, केडगाव शहर अध्यक्ष महेश गाडे, भिंगार शहर अध्यक्ष संतोष हजारे, प्रसाद बनकर, गणेश जाधव, मोहित सत्रे, स्वप्निल पडोळे, विक्रम बोरुडे, विश्‍वास शिंदे, संकेत लोंढे, संकेत ताठे, आशिष भगत, महेश सुडके, गणेश शेलार, रेमेश पुंड, यश लिगडे, गणेश बोरुडे, बबलू फाळके आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.


शहर अध्यक्ष दिपक खेडकर म्हणाले की, ज्या बहुजन समाजाला कर्मवीर भाऊराव पाटील, महात्मा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाची दारे उघडी करुन दिली, त्यांच्याबद्दल चुकीचे विधान निंदनीय आहे. वादग्रस्त व अज्ञानपणाचे विधान करुन समाजात असंतोष पसरविण्याचे काम सत्ताधारी नेते व मंत्री करीत आहे. पुरोगामी महाराष्ट्रात महापुरुषांबद्दल केलेले चुकीचे विधान खपवून घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट करुन, या महापुरुषांच्या संघर्षातून चुकीचे विधान करणार्‍या मंत्र्याला शिक्षणाची भीक मिळाली असल्याचा आरोप त्यांनी केला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *