• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

झोपेच्या तक्रारींवरती निद्रा योग साधना कार्यशाळेचे आयोजन

ByMirror

Nov 19, 2022

निरोगी जीवनशैलीसाठी योग जागृती केंद्राचा उपक्रम

अहमदनगर (प्रतिनिधी)- बदललेल्या जीवनशैली मुळे अनेक आजारांना तोंड द्यावे लागत असल्याने व झोपेच्या तक्रारींवरती कोणताही उपचार किंवा औषध नसल्यामुळे आरोग्याच्या नवनवीन समस्यांपासून मुक्ती मिळविण्यासाठी योग जागृती केंद्राच्या वतीने भारतीय योगशास्त्राचा अंर्तभाव असलेल्या निद्रा योग साधना या 5 दिवशीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती नंदकुमार यन्नम व प्रार्थना यन्नम यांनी दिली.


आपल्या जीवनातील बराच काळ झोपण्यासाठी द्यावा लागतो आणि त्यात झोपेच्या समस्या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. पुरेशी झोप न झाल्यामुळे आरोग्याच्या नवनवीन समस्या उदभवू लागल्या असून, त्यात निद्रानाश, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, मधुमेह,नैराश्य इत्यादींचा समावेश आहे.


झोपेच्या तक्रारींवरती कोणताही उपचार किंवा औषध नसल्यामुळे अनेक लोक झोपेच्या गोळ्यांच्या आहारी जातात. त्यामुळे जीवनचक्र विस्कळीत होऊन जाते. योगशास्त्रामध्ये झोपेच्या समस्या दूर करण्याची ताकद आहे. याचा लाभ सर्वसामान्यांना मिळण्यासाठी निद्रा योग साधना कार्यशाळेचे आयोजन केले गेले आहे. 23 ते 27 नोव्हेंबर 2022 दरम्यान सावेडी येथील योग जागृती केंद्रात रात्री 8:30 ते 9:30 या वेळेत ही कार्यशाळा होणार आहे. अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी 8329760052 व 9028203771 या नंबरवर संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.


By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *