• Sun. Jun 21st, 2026

Mirrornews24

Marathi News

राज्यपालांसाठी होम कॉरंटाईन जनादेश जारी करण्याची घोषणा

ByMirror

Dec 13, 2022

पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेचा पुढाकार

महापुरुषांबद्दल चुकीच्या विधान प्रकरणी राज्यपालांना घरी पाठविण्याची मागणी

अहमदनगर (प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल चुकीचे व वादग्रस्त विधान करणार्‍या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात पीपल्स हेल्पलाईन व भारतीय जनसंसदेच्या वतीने शुक्रवारी 16 डिसेंबर रोजी होम कॉरंटाईन जनादेश जारी केला जाणार असल्याची माहिती अ‍ॅड. कारभारी गवळी व अशोक सब्बन यांनी दिली.


महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी उन्नत चेतनेचे दीपस्तंभ असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांविरुद्ध अनेक वेळेला अवमानकारक विचार मांडले आहे. तसेच त्यांनी इतर महापुरुषांबद्दलही चुकीचे वादग्रस्त विधान करुन महाराष्ट्रात असंतोष निर्माण केला आहे. राज्यपाल कोश्यारी यांना त्यांच्या मूळ राज्यात घरी पाठविल्यास यापुढे महापुरुषांची बदनामी करण्याची त्यांना संधी मिळणार नसल्याचे संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


शुक्रवारी नागरिकांच्या स्वाक्षर्‍यांचे निवेदन व होम कॉरंटाईन जनादेशची प्रत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांकडे दिली जाणार आहे. कोश्यारी यांनी शिवाजी महाराज व इतर महापुरुषांबद्दल बदनामीकारक वक्तव्य करून, देशात वाद सुरू केला आहे. त्यामुळे त्यांना घरी पाठवल्या शिवाय पर्याय नसल्याचे संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यकारभार हा गेल्या दोन हजार वर्षातील मानव जातीच्या इतिहासामध्ये अग्रस्थानी राहिलेला आहे. जगतजेता सिकंदरापेक्षा शिवाजी महाराजांचे कार्य फार मोठे आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेला दीपस्तंभ कोणालाही मोडीत काढता येणार नसल्याचे अ‍ॅड. गवळी यांनी म्हटले आहे. या आदोलनासाठी डॉ. क़ॉ. महेबूब सय्यद, अर्शद शेख, सुधीर भद्रे, वीरबहादूर प्रजापती, शाहीर कान्हू सुंबे, कैलास पठारे, अशोक भोसले, प्रकाश थोरात आदी प्रयत्नशील आहेत.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *