• Tue. Jun 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

विजय भालसिंग यांचा नॅशनल गोल्डन स्टार एक्सलन्स अवॉर्डने गौरव

ByMirror

Oct 10, 2023

वाशी येथे झाला भालसिंग यांच्या सामाजिक कार्याचा सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- येथील सामाजिक कार्यकर्ते विजय भालसिंग यांना निस्वार्थ सामाजिक कार्याबद्दल वाशी (मुंबई) येथील इनोव्हेटिव्ह मानबिंदू प्रकाशन, अमरदीप बालविकास फाउंडेशन आणि महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल गोल्डन स्टार एक्सलन्स अवॉर्डने गौरविण्यात आले.


वाशी (मुंबई) येथे झालेल्या पुरस्कार प्रदान सोहळ्याचे प्रमुख पाहुणे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.एस.एन. पठाण यांच्या हस्ते भालसिंग यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी श्रीमंत संभाजीराव जाधव, ॲड. रमेश राठोड, डेप्युटी कमिशनर ऑफ जी.एस.टी. यास्मीन मोळकर, इंडियन नेव्हीच्या शालिनी आगरवाल, शास्त्रज्ञ डॉ. अमजदखान पठाण, सिनेकलाकार संजय मोने, एन.डी. खान, डॉ. शैलेंद्र पवार, सलमा खान, यशवंत चौहान आदी मान्यवर उपस्थित होते.


सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक व आरोग्य क्षेत्रात विजय भालसिंग गेल्या दोन दशकापासून योगदान देत आहे. मुळगाव वाळकी (ता. नगर) असलेले भालसिंग एसटी बँकेत कार्यरत असून कोणत्याही प्रकारचे शासकीय अनुदान व वर्गणी न घेता स्वखर्चातून सेवा करत आहे. गरजू-निराधार विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, मंदिराचे जीर्णोध्दार, सार्वजनिक परिसर व बारवची स्वच्छता, वारकरी संप्रदायाचे संघटन, वृक्ष रोपण आदी विविध सामाजिक उपक्रम राबवित आहेत. त्यांच्या निस्वार्थ कार्याची दखल घेऊन त्यांना नॅशनल गोल्डन स्टार एक्सलन्स अवॉर्ड देण्यात आला आहे.


उपस्थित पाहुण्यांनी भालसिंग यांना पुरस्कार प्रदान करुन त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *