• Tue. Jun 16th, 2026

Mirrornews24

Marathi News

श्री मार्कंडेय पतसंस्थेला सहकार समृद्ध पुरस्कार जाहीर

ByMirror

Oct 17, 2023

शनिवारी शिर्डीला महसूल मंत्री व सहकार आयुक्तांच्या हस्ते पुरस्काराने होणार सन्मान

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील श्री मार्कंडेय नागरी सहकारी पतसंस्थेला अहमदनगर जिल्हा पतसंस्थेचा स्थैर्य निधी संघाचा मानाचा सहकार समृद्ध पुरस्कार 2023 जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ओमप्रकाश (काका) कोयटे, पतसंस्थेचा स्थैर्य निधी संघाचे अध्यक्ष सुरेश वाबळे व उपाध्यक्ष वसंत लोढा यांनी पुरस्काराची नुकतीच घोषणा केली.


सहकार क्षेत्रात नाविन्यपूर्ण व उल्लेखनीय काम करणाऱ्या तसेच ठेविदार आणि सभासदांचे हीत जपणाऱ्या पतसंस्थांच्या कार्याला व संचालक मंडळाला प्रोत्साहन मिळण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार दिला जातो. श्री मार्कंडेय पतसंस्थेच्या माध्यमातून संस्थेचे चेअरमन नारायण कोडम, व्हाईस चेअरमन विनायक मच्चा, संस्थेचे संस्थापक बालराज समाल (सर) व सर्व संचालक मंडळाने सभासद हितासाठी राबविलेले विविध उपक्रम, पतसंस्थेची अद्यावत डिजिटल प्रणाली, अभ्यासिका व ग्रंथालयाच्या माध्यमातून युवकांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन उपक्रम, महिला, युवकांना उद्योग-व्यवयासाठी प्रोत्साहन, रक्तदान शिबिर, वाचनालय या सर्व उपक्रमाची दखल घेऊन पुरस्कार निवड समितीने सर्वेक्षण केलेल्या मूल्यांकनानुसार सहकार समृद्ध पुरस्कारसाठी श्री मार्कंडेय पतसंस्थेची निवड केली आहे.


संस्थेला जाहीर झालेल्या पुरस्कारासाठी सर्व संचालक, सभासद व ठेवीदारांचे विशेष योगदान असून, संचालक मंडळाने केलेल्या उत्तम कार्याची ही पावती असल्याची भावना चेअरमन नारायण कोडम यांनी व्यक्त केली. शनिवारी (दि.21 ऑक्टोबर) शिर्डी येथे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार आयुक्त अनिल कवडे, बुलढाणा अर्बन बँकेचे चेअरमन राधेश्‍यामजी चांडक यांच्या हस्ते श्री मार्कंडेय पतसंस्थेला सहकार समृद्ध पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पतसंस्थेच्या सर्व संचालक मंडळाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *