• Wed. Jul 1st, 2026

Mirrornews24

Marathi News

शहरातील हुतात्मा स्मारकात 26-11 च्या दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली

ByMirror

Nov 26, 2025
शहिदांनी दिलेल्या बलिदानाच्या स्मृतींना दिला उजाळा

लायन्स क्लब, घर घर लंगर सेवा व मराठी पत्रकार परिषदेच्या वतीने अभिवादन


शहिदांनी दिलेल्या बलिदानाच्या स्मृतींना दिला उजाळा

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- 26-11 ला मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील शहिद जवान व पोलीसांना लायन्स क्लब ऑफ अहमदनगर, घर घर लंगर सेवा आणि मराठी पत्रकार परिषदच्या वतीने हुतात्मा स्मारकात पुष्पचक्र वाहून व मेणबत्त्या प्रज्वलीत करुन श्रध्दांजली वाहण्यात आली.


या अभिवादन कार्यक्रमाप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष डॉ. संजय असनानी, घर घर लंगर सेवेचे हरजितसिंह वधवा, मराठी पत्रकार परिषदेचे राज्य कोषाध्यक्ष मन्सूर शेख, लायन्स क्लबचे खजिनदार दिलीप कुलकर्णी, प्रकल्प प्रमुख धनंजय भंडारे, अमोल अडबल्ले, गोपाळ ढाकणे, सुभाष रणदिवे, राजेश बत्तीन आदी उपस्थित होते.


26-11 च्या दहशतवादी हल्ल्यात स्वतःची व कुटुंबाची परवा न करता पोलीस अधिकारी, कर्मचारी व जवानांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी बलिदान दिले. शहिदांनी दिलेल्या बलिदानाच्या स्मृतींना उजाळा देऊन, अभिवादन करण्यात आले. हुतात्मा स्मारकावर उपस्थितांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करुन व मेणबत्त्या प्रज्वलीत करुन 26-11 दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना श्रध्दांजली वाहण्यात आली. उपस्थितांनी भारत माता की जय…, वंदे मातरम…च्या दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणला.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *