• Mon. Jun 15th, 2026

Mirrornews24

Marathi News

इलाक्षी ह्युंदाई मध्ये दी ऑल न्यू ह्युंदाई फेसलिफ्ट व्हेन्यू कारचे अनावरण

ByMirror

Nov 12, 2025
इलाक्षी ह्युंदाई मध्ये दी ऑल न्यू ह्युंदाई फेसलिफ्ट व्हेन्यू कारचे अनावरण

तत्पर सेवेतून इलाक्षी ह्युंदाईने ग्राहकांचा विश्‍वास संपादन केला -आ. संग्राम जगताप

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- मास मार्केट ब्रॅण्ड दरम्यान विक्री पश्‍चात सेवा सर्व्हिसमध्ये ग्राहकांची प्रथम पसंती मिळवणाऱ्या ह्युंदाई कंपनीचे अधिकृत डीलर इलाक्षी ह्युंदाई येथे दी ऑल न्यू ह्युंदाई फेसलिफ्ट व्हेन्यू कारचे अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी संचालक विजयकुमार गडाख, जनरल मॅनेजर राजू बेजगमवार, सेल्स मॅनेजर अजय मगर, संदीप देवकाते आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.


आ. संग्राम जगताप म्हणाले की, व्यवसाय क्षेत्रामध्ये चांगले नावलौकिक असलेला माणूस जीवनशैली गतीमान करण्यासाठी चारचाकी वाहन घेतो. त्यावेळी त्या व्यवसायाला अजून बळकटी मिळण्याचे काम होत असते. ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये गडाख परिवाराने पाऊल टाकून ग्राहकांना विविध सोयी-सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. तत्पर सेवेतून इलाक्षी ह्युंदाईने ग्राहकांचा विश्‍वास संपादन केला आहे. तर सर्वसामान्यांचे चारचाकी वाहनाचे स्वप्न पूर्ण करण्याचे काम इलाक्षी ह्युंदाई करत आहे. यामध्ये राजू बेजगमवार व अजय मगर यांच्या टीमचा मोठा वाटा आहे. नवीन लॉन्च झालेल्या वेन्यू कारमध्ये मोठे बदल करण्यात आले असून, ग्राहकांना चांगल्या सुविधा निर्माण करुन देण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे सुरक्षा ही पहिल्यांदा बघितली जाते. नवीन आलेल्या व्हेन्यू गाडीमध्ये पूर्ण सुरक्षा दिलेली असल्याचे त्यांनी सांगितले.


प्रास्ताविकात सेल्स मॅनेजर अजय मगर यांनी नवीन व्हेन्यू गाडी मधील नव नवीन असलेल्या फीचर्स बद्दल माहिती सांगितली. एकत्र कुटुंब पध्दती असल्याने भारतीय जास्त सदस्य बसू शकतील अशा गाड्‌यांना पसंती देत असतात. अलीकडच्या काळात ही मागणी फार वाढली असून, त्यामुळे बाजारात पाच सीटर कारची विक्री मोठ्या प्रमाणावर होत आहे. यामुळेच आता कंपन्याही त्यांच्या 5-सीटर SUV कारचे मॉडेल्स लाँच केले आहे. यातच कार निर्माता ह्युंदाई इंडिया सुध्दा देशातील बाजारात मोठा धमाका करण्यासाठी सज्ज झाली आहे. ह्युंदाई इंडियाने नवीन व्हेन्यू फेसलिफ्ट आली असून, नवीन वाहनाच्या सेगमेंट मध्ये वाजवी दरात उत्कृष्ट सुविधांचा लाभ मिळणार आहे. ज्या सुविधा इतर स्पर्धक कंपन्यांच्या गाड्यांमध्ये उपलब्ध नाहीत. तसेच मोनोटोन, ड्युअल टोन,हेझेल ब्लू, हेझेल ब्लू, मिस्टिक सफायर न्यू कलर, एटलस व्हाईट,ड्रॅगन रेड,टायटन ग्रे,एटलस व्हाइट,एबिस ब्लॅक,या रंग चा समावेश असून व्हेन्यू मध्ये पेट्रोल1.2 टर्बो व डिझेल 1.5 CRDI इंजिन पर्यायां मध्ये उपलब्ध आहे. ही दिसायला पूर्वी पेक्षा खूपच आकर्षक व मजबूत असून, आकर्षक रंगात उपलब्ध होणार आहे.


नवीन फेसलिफ्ट व्हेन्यू चे आणखी सेफ्टी सुधारण्यासाठी, कंपनीने त्यात Advanced Driving Assistance System लेव्हल -2 (ADAS) समाविष्ट केला आहे. यात 32 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स देण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. यात 6 एअरबॅग्ज, व्हॉईस ऍक्टिव्हेटेड इलेक्ट्रॉक सनरूफ, पॅडल शिफ्टर्स, पॉवर ड्रायव्हर आणि पॅसेंजर सीट्‌स, हवेशीर फ्रंट सीट्‌स, वायरलेस चार्जिंग पोर्ट, लेदर अपहोल्स्ट्री, BOSE साउंड सिस्टम, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल, रेन सेन्सिंग वायपर, अनुक्रमिक टर्न इंडिकेटर, ऑन-बोर्ड आहेत. नेव्हिगेशन 360-डिग्री कॅमेरा आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल सारखी फीचर्स उपलब्ध आहेत.


नामवंत बँका व फायनान्स कंपन्यांकडून झिरो प्रोसेसिंग फी 100 टक्के ऑन रोड फायनान्स सुविधा उपलब्ध आहे. ह्युंदाई प्रॉमिसच्या माध्यमातून ग्राहकांना जुन्या गाडीची एक्सचेंज सुविधा देण्यात आलेली आहे. दररोज ग्राहकांची बुकिंग साठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सदर वाहन इलाक्षी ह्युंदाई मध्ये डेमो व टेस्ट ड्राईव्हसाठी उपलब्ध आहे. ग्राहकांनी अधिक माहितीसाठी शोरूमला भेट देऊन संधीचा लाभ घेण्याचे आवाहन इलाक्षी ह्युंदाईचे जनरल मॅनेजर राजू बेजगमवार यांनी केले आहे.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *