• Sat. Jul 4th, 2026

Mirrornews24

Marathi News

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीचा जल्लोष

ByMirror

Aug 1, 2025
सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकांच्या मृत्यू प्रकरणी न्यायाचा मार्ग मोकळा

सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकांच्या मृत्यू प्रकरणी न्यायाचा मार्ग मोकळा


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करुन दोषी पोलिसांवर तातडीने गुन्हे दाखल करण्याची मागणी

नगर (प्रतिनिधी)- काही दिवसांपूर्वी राज्यात गाजलेल्या सोमनाथ सूर्यवंशी मृत्यूप्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश कायम केल्याबद्दल शहरातील स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीच्या वतीने मार्केटयार्ड येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासमोर आनंदोत्सव साजरा करण्यात आला.


या भीमसैनिकाची हत्या झालेली असताना देखील न्याय मिळत नव्हता, मात्र या युवकाला न्याय मिळण्यासाठी मार्गे मोकळा झाल्याने आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना मिठाई वाटून आनंद व्यक्त केला. प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांनी जय भीमच्या घोषणा देत, दोषी पोलीसांवर तातडीने गुन्हे दाखल करुन कठोर कारवाईची मागणी केली.


परभणी येथील हिंसाचारमध्ये सोमनाथ सूर्यवंशी या भीमसैनिकाचा मृत्यू झाला होता. सदर युवकाचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाला होता, असा दावा पोलीस आणि राज्य सरकारने केला होता. मात्र, पोलिसांच्या मारहाणीमुळे पोलीस कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाल्याचा आरोप झाला होता. ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी हे प्रकरण न्यायालयात लावून धरले होते. यानंतर उच्च न्यायालयाने सूर्यवंशी मृत्यूप्रकरणात गुन्हा दाखल करण्याचा आदेश राज्य सरकारला दिले होते. याविरोधात राज्य सरकारने तात्काळ सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयानेही मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल कायम ठेवल्याबद्दल स्वाभिमानी आंबेडकरी चळवळीच्या वतीने भीमसैनिकाला न्याय मिळण्यास मार्ग मोकळा झाला असल्याची भावना व्यक्त केली. तर न्याय व्यवस्थेवर विश्‍वास असल्याचे स्पष्ट करुन, भीम सैनिकाला न्याय मिळण्यासाठी लढा देणारे ॲड. प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानण्यात आले.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *