• Sun. Jul 12th, 2026

Mirrornews24

Marathi News

यतिमखाना संचलित अहमदनगर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे दहावी बोर्डाच्या परीक्षेत यश

ByMirror

May 20, 2025

अरबिना शेख व आसिया शेख 73.80% गुण मिळवून शाळेत प्रथम

नगर (प्रतिनिधी)- अहमदनगर यतिमखाना संचलित अहमदनगर हायस्कूल (मराठी माध्यम) या विद्यालयाचा मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या इ.10 वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल 90 टक्के लागला. विद्यार्थ्यांनी उत्तमप्रकारे गुण मिळवून यश संपादन केले.


शेख अरबिना समीर व शेख आसिया रहीम या दोघांनी 73.80% गुण मिळवून शाळेत प्रथम येण्याचा बहुमान पटकाविला. खान नगमा सलीम 68.80% हिने द्वितीय व कुरेशी मेहेक रमजान 65.80% ही तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाली.
अहमदनगर यतिमखाना संस्थेचे चेअरमन हाजी सय्यद अलीमभाई, संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि संचालक तसेच विद्यालयाच्या प्राचार्या सय्यद शाहीदा आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *