• Tue. Jul 14th, 2026

Mirrornews24

Marathi News

राज्यस्तरीय शूटिंग स्पर्धेत नगरच्या खेळाडूंची दमदार कामगिरी

ByMirror

Apr 2, 2026
8 नेमबाजांची नॅशनल स्पर्धेसाठी निवड

8 नेमबाजांची नॅशनल स्पर्धेसाठी निवड

अहिल्यानगर (प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय रायफल शूटिंग स्पर्धेत अहिल्यानगर शहरातील खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन करत आपल्या कौशल्याचा ठसा उमटवला आहे. अहिल्यानगर सिटी रायफल ॲण्ड पिस्तोल स्पोर्ट्‌स शूटिंग क्लबच्या तब्बल 8 खेळाडूंनी उत्कृष्ट नेमबाजी करत नॅशनल स्पर्धेसाठी आपली निवड निश्‍चित केली आहे.


या स्पर्धेत 10 मीटर एअर रायफल प्रकारात मुग्धा राजापुरे, किर्ती चक्रवर्ती, कार्तिकी कोकाटे, प्रिशा मुनोत आणि राजलक्ष्मी घडेकर यांनी अचूक निशाण साधत यश मिळवले. तर 10 मीटर एअर पिस्तोल प्रकारात रेवा शिंदे, अश्‍विनी महानूर आणि स्वाती काळे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत जिल्ह्याचा नावलौकिक वाढवला.


या सर्व खेळाडूंना प्रशिक्षक अलीम शेख, ऋषिकेश दरंदले आणि सागर फाटके यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच क्लबच्या सेक्रेटरी सुनीता लिपने यांनी खेळाडूंच्या तयारीसाठी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या सातत्यपूर्ण मेहनतीमुळेच खेळाडूंना हे यश मिळवता आले आहे. या यशाबद्दल खेळाडूंवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, निवासी जिल्हाधिकारी दादासाहेब गीते, आमदार संग्राम जगताप, खासदार नीलेश लंके, जिल्हा क्रीडा अधिकारी ज्ञानेश्‍वर खुरंगे यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील विविध मान्यवरांनी खेळाडूंना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

By Mirror

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *